समुद्रकिनाऱ्यावरुन कार पळवताना ओली वाळू सरकली आणि कार समुद्रात अडकली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पालघर : हॅलो महाराष्ट्र – समुद्रकिनाऱ्यावर कार चालवण्यास लोकांना सक्त मनाई आहे. पण काही पर्यटकांना काहीतरी वेगळे करण्याची हौस असते. मात्र कधी कधी हीच हौस त्यांच्या अंगलट येते. अशीच एक घटना अर्नाळा समुद्र (arnala sea) किनाऱ्यावर घडली आहे. यामध्ये अर्नाळा समुद्र (arnala sea) किनाऱ्यावर भरतीच्या पाण्यात मारुती सुझुकीची अर्टिगा ही गाडी वाळूत रुतली. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. समुद्राच्या किनाऱ्यावरुन ओल्या वाळूत काही पर्यटकांना कार चालवण्याचा प्रयत्न केला. पण समुद्राच्या भरतीच्या पाण्यात ही कार अडकली आणि वाळूमध्ये रुतून बसली. बराच वेळ ही कार वाळूतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु होते. पण चाकं गोल फिरल्यानंतर ही कार वाळूमध्ये अधिकच खोलवर रुतत होती. भिवंडीतून आलेल्या दोघा पर्यटकांना समुद्र किनाऱ्यावर कार चालवणं यावेळी चांगलेच अंगलट आले आहे. हि वाळूत रुतलेली कार बाहेर काढताना पर्यटकांच्या नाकीनऊ आले होते.

कधी घडली घटना?
रविवारी दुपारी भिवंडीतून दोघेजण अर्नाळा किनाऱ्यावर मौजमजा करण्यासाठी आले होते. अर्नाळ समुद्र (arnala sea) किनाऱ्यावर आले असता या पर्यटकांना किनाऱ्यावर कार चालण्याचा मोह आवरला नाही. शेवटी त्यांनी किनाऱ्यावर कार घातली आणि समुद्र किनाऱ्याच्या कडेकडेने जात असताना भरतीच्या पाण्यात ही कार अडकली. अर्नाळ ते राजोडी समुद्रा किनाऱ्यावर भरधाव वेगाने हे पर्यटक कार पळवत होते. स्थानिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्नसुद्धा केला मात्र त्यांनी कोणाचेच ऐकले नाही. अखेर समुद्र किनाऱ्यावरुन गाडी चालवणे अंगलट आले आहे.

हे पण वाचा :

नाशिकमध्ये रेल्वेखाली उडी घेऊन माय-लेकीची आत्महत्या

बड्डे आहे भावाचा !!! जल्लोष साऱ्या गावाचा !!!

राज्यसभा निवडणुकीत कोणी घोडेबाजार करण्याचा प्रयत्न केल्यास…; संजय राऊतांचा थेट फडणवीसांना इशारा

राज्य सरकारांकडून पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये आणखी कपात केली जाणार ???

आता खिसा होणार रिकामा, जूनमध्ये केले जाणार ‘हे’ 5 आर्थिक बदल !!!

Leave a Comment