हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PAN-Aadhar Linking : जर आपण आधार आणि पॅन कार्ड लिंक केले नसेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करा. कारण असे करण्यासाठी आता आपल्याकडे फक्त 6 दिवसच आहेत. हे ठेवा कि आधार-पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे. मात्र या तारखेनंतर आपल्याला मोठा दंड भरावा लागेल.
हे लक्षात घ्या कि, 30 जून किंवा त्यापूर्वी पॅन आधारशी लिंक केल्यास 500 रुपये दंड भरावा लागेल. दुसरीकडे, जर 1 जुलै रोजी किंवा त्यानंतर पॅन-आधार लिंक केले तर त्यासाठी 1000 रुपये द्यावे लागतील. आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख मार्च 2022 रोजीच संपली होती. PAN-Aadhar Linking
भरावा लागेल दुप्पट दंड
आधार-पॅन लिंक करण्यासाठी आयकर कायद्याच्या कलम 234H नुसार CBDT ने 31 मार्च 2022 पर्यंतचा वेळ दिला होता. मात्र यानंतर लिंक करण्यास 500 रुपये दंड आकारण्यात आला. तसेच यानंतर लिंक करण्याची अंतिम तारीख 1 एप्रिल ते 30 जून 2022 करण्यात आली. आता यासाठी आपल्याला आणखी एक संधी मिळाली आहे. म्हणजेच ही वेळ 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आली. इथे हे लक्षात घ्या कि, हि वेळ जरी वाढवण्यात आली असली तरीही 31 मार्च 2023 पर्यंत पॅन-आधार लिंकिंगसाठी 1000 रुपये लेट फीस भरावी लागेल. PAN-Aadhar Linking
पॅन-आधार लिंक न करण्याचे तोटे
पॅन-आधार लिंक न करण्याचे जसे फायदे आहेत तसेच त्याचे अनेक तोटे देखील आहेत. असे केले नाही तर आपले पॅन कार्ड बंद केले जाईल. पॅन कार्ड नसेल तर आपल्याला बँकेत खाते देखील सुरु करता येणार नाही. तसेच याशिवाय म्युच्युअल फंड, स्टॉकमध्ये गुंतवणूक करता येणार नाही. याबरोबरच जर तुम्ही अवैध पॅन कार्ड वापरले तर आयकर कायदा 1961 च्या कलम 272B अंतर्गत दंड म्हणून 10 हजार रुपये द्यावे लागतील. PAN-Aadhar Linking
PAN-Aadhar Linking साठी या वेबसाईटला भेट द्या : https://uidai.gov.in/282-faqs/your-aadhaar/aadhaar-letter/1884-how-do-i-link-pan-with-aadhaar.html
हे पण वाचा :
PM Kisan च्या e-KYC ची शेवटची तारीख पुन्हा वाढवण्यात आली, अशा प्रकारे पूर्ण करा प्रक्रिया
Gold Price Today : सोन्यामध्ये घसरण तर चांदी तेजीत, नवीन दर तपासा
PNB ग्राहकांना आता चेक पेमेंटच्या एक दिवस आधी बँकेला द्यावी लागणार माहिती !!!
Atal Pension Yojana : ‘या’ सरकारी योजनेत दरमहा 210 रुपये जमा करून मिळवा मासिक पेन्शन !!!
PF Account : आता घरबसल्या अशा प्रकारे जनरेट करा UAN नंबर !!!