पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील विसर्जन मिरवणूक पारंपारीक पद्धतीर, पहा व्हिडिओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी | पंढरपूर येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील गणेश विसर्जन मिरवणूकीला उत्साहात सुरवात झाली. प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते गणपतीचे पूजन करून मिरवणूकीला सुरवात झाली.

गणेश विसर्जन मिरवणूकीत यंदाही पारंपारिक लेझीम संघ सहभागी झाले आहेत. या शिवाय हालगीचा खणखणनाट आणि बॅन्डच्या सुमधूर स्वर आणि येथील ज्ञानेश्वर वारकरी शिक्षण संस्थेतील बाल वारकर्‍यांनी टाळ मृदगांच्या ठेक्यावर धरलेल्या ताल … यामुळे मंदिर परिसरातील वातावरण अगदी भारावून गेले आहे.

मिरवणूकीत मंदिर समितीचे सदस्य अतुल भगरे सहभागी झाले आहेत. मंदिरातील गणेश विसर्जन मिरवणूकीनंतर शहरातील घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांनी बप्पा निरोप देण्यासाठी चंद्रभागेत गर्दी सुरू केली आहे.