पंढरपुर । अकरावीत शिक्षण घेणाऱ्या १७ वर्षीय मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लष्करात जाऊन देशाची सेवा करण्याचे स्वप्न मुलीने पाहिले होते. स्वप्नाली सत्यवान गाजरे असं आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. आत्महत्या केल्याचा प्रकार पंढरपूर तालुक्यातील शेळवे गावात उघड झाला आहे.
‘लष्करात जाऊन भारतमातेची सेवा करण्याचे स्वप्न गावातीलच तिघांमुळे धुळीस मिळाले आहे,’ असे दु:ख स्वप्नालीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मांडले आहे. स्वप्नालीने ६ डिसेंबरच्या रात्री गळफास घेतल्यावर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी तिच्या मृत्यूची अकस्मात मयत म्हणून नोंद केली. मात्र, १० डिसेंबर रोजी तिच्या दप्तरात सापडलेल्या चिठ्ठीवरून पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या तीन आरोपींत दोन आरोपी विवाहित असून, एकजण पन्नाशीतील आहे. या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, तिघांनाही पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
‘हे भारतमाते मला माफ कर’
स्वप्नालीच्या वडिलांचा गावात पंक्चर काढण्याचा व्यवसाय आहे. त्यांचा अपघात झाल्यावर स्वप्नाली घरकामासोबतच वडिलांना या कामातही मदत करत होती. लष्करात भरती व्हायचे म्हणून ती नियमित व्यायामही करत होती. कोरोनामुळे तिचे अकरावीचे शिक्षण घरूनच सुरू होते. मात्र, ‘गावातील रमेश गाजरे, स्वप्नील कौलगी आणि लहू टेलर यांच्याकडून सातत्याने छेडछाड होत असल्याने जीवन संपवत आहे. आता मला सहन होत नाही. तिरंगा आणि लष्कराचा गणवेश माझ्या नशिबी नाही. हे भारतमाते मला माफ कर,’ असे तिने चिठ्ठीत लिहिले आहे. या छेडछाडीचा त्रास ती नववीत असल्यापासून सहन करत होती. याबाबत तिने आई-वडिलांनाही सांगितले होते. वडिलांनी प्रयत्न करूनही छेडछाड थांबली नसल्याने अखेर तिने जीवन संपवले.
महिला अत्याचार प्रतिबंधक 'शक्ती विधेयक' विधिमंडळाच्या पटलावर, चर्चेनंतर मिळणार मंजुरी?
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/oeK6T74mhn#CrimesAgainstHumanity #crimeagainstwomen #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 14, 2020
लाखोंची पाणीपट्टी थकवली! मुख्यमंत्री ठाकरेंसह इतर मंत्र्यांचे बंगले BMCकडून डिफॉल्टर घोषित
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/QWV8sV1E7b@mybmc #HelloMaharashtra @CMOMaharashtra @ShivSena— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 14, 2020
सरकारी बंगल्यांवर ९० कोटी खर्चाचा आकडा आणला कुठून?; अजित पवारांनी आरोप फेटाळले
वाचा सविस्तर- https://t.co/gee3Ue5h8Q@AjitPawarSpeaks @NCPspeaks @BJP4Maharashtra #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 14, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’