Saturday, March 25, 2023

पांडुरंग लोहार – गुरूजी यांचे निधन

- Advertisement -

कराड | तालुक्यातील तांबवे येथील पांडुरंग तातोबा लोहार – गुरूजी (वय- 75) यांचे शुक्रवारी सकाळी ह्दयविकाराने निधन झाले. उंडाळे भागातील म्हारूगडेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक म्हणून त्यांनी सेवा बजावली होती. उत्तर तांबवे, किरपे, विंग येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांनी उपशिक्षक म्हणून काम पाहिले. सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचा सहभाग असे.

भजनी मंडळात ते हर्मोनियम वादक म्हणून परिसरात परिचित होत. तर परिसरात रंगराव गुरूजी या नावाने लोक त्यांना अोळखत. त्याच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना व नांतवडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी सकाळी 9.30 वाजता तांबवे येथे होणार आहे.

- Advertisement -