व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

ही प्रजाती फक्त भंगारात आढळते; मलिकांच्या ‘त्या’ ट्विटला नितेश राणेंचे प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना उद्देशून म्याव म्याव असा आवाज काढल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी कोंबड्याचा फोटो ट्विट करत राणेंची खिल्ली उडवली होती. त्यानंतर नितेश राणे यांनी देखील 1 फोटो ट्विट करत नवाब मलिक यांच्यावर पलटवार केला आहे.

नितेश राणे यांनी एक फोटो शेअर करत म्हंटल आहे की, ही प्रजाती फक्त भंगार मध्ये आढळते, ओळखा पाहू कोण??.. नितेश राणेंच्या या टीकेनंतर आता मलिक-राणे यांच्यातील हे ट्विटर वॉर वाढण्याची शक्यता आहे.

नवाब मलिक यांचं ट्विट नेमकं काय-

नवाब मलिक यांनी ट्विट करत एका कोंबड्याचा फोटो शेअर करत ओळखा पाहू कोण ? असा सवाल केला आहे. मलिक यांच्या फोटोवरून त्यांचा रोख हा नितेश राणे यांच्या कडेच दिसला. मलिक यांनी आपल्या ट्वीटमध्ये शेअर केलेल्या फोटोमध्ये एक कोंबडा दिसत आहे. पांढऱ्या रंगाच्या या कोंबड्याच्या डोक्यावर लाल रंगाचा एक तुरा देखील आहे. पण विशेष म्हणजे या कोंबड्याचा चेहरा मात्र मांजरीचा आहे.