कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
छत्रपती संभाजी महाराजांचा 340 वा राज्य भिषेक दिन सोहळा कोल्हापूरच्या पन्हाळगडावर उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याच आयोजन छत्रपती शंभुराजे राज्याभिषेक तुम्ही आज आणि पन्हाळा गिरीस्थान नगर परिषद तर्फे करण्यात आलं होतं. सकाळी आठ वाजल्यापासून पन्हाळगडावरील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर इथून ध्वज पूजन, गणेश पूजन आणि पालखी पूजनाने सोहळ्याची सुरुवात झाली.
तसंच अकरा नद्यांचे पाणी आणि अकरा मुलींचा हस्ते पूजन करण्यात आले. पन्हाळा गडावरील मुख्य मार्गावरून ही मिरवणूक मार्गस्थ झाली यावेळी मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिक देखील करण्यात आल. या सोहळ्याला संभाजी महाराजांचे फक्त शिवप्रेमी मोठ्याप्रमाणावर उपस्थित होते. छत्रपती संभाजी महाराज की जय या घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला होता.