टीम, HELLO महाराष्ट्र । बिग बजेट इतिहासपट बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेले आशुतोष गोवारीकर यांच्या बहुचर्चित ‘पानीपत’ या चित्रपटाची गेल्या काही वर्षांपासून उत्सुकता होती. मोठ्या पडद्यावर ऐतिहासिक पात्रांच्या सहाय्याने इतिहासाची पुनरावृत्ती करण्यात माहीर असलेले गोवारीकर पानिपतमधून तोच सिलसिला कायम ठेवतील अशी अशा प्रेक्षकांना होती. त्याचबरोबर पानिपत चित्रपटात अर्जुन कपूर आणि कृती सॅनॉन प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र आले आहेत. याबरोबरच अभिनेता संजय दत्तनेही या चित्रपटात चमकदार अभिनयाची जोड देत सर्वांचे लक्ष वेधले आहे. असं सर्व काही असताना मात्र हा बहुचर्चित चित्रपट पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसावर मोठी कामगिरी करू शकला नाही आहे. मात्र, असे असले तरी या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात बऱ्यापैकी व्यवसाय केला आहे असे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान पानिपतसोबत अभिनेता कार्तिक आर्यनचा ‘पती पत्नी और वो’ हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळं या दोघांचित्रपटापैकी नेमकं कोण बॉक्स ऑफिसर कोण बाजी मारेल याकड सिनेमा जगताच लक्ष लागून आहे. पण सध्या कार्तिक आर्यनने बाजी मारल्याचे चित्र दिसत सध्या आहे. मात्र सध्या प्रेक्षक आणि समीक्षकांकडून ‘पानिपत’ची चांगलीच तारीफ होत आहे. दरम्यान पानिपत चित्रपटाची कथा हि ऐतिहासिक पानिपतच्या तिसर्या युद्धाच्या भोवती फिरते. त्यामुळे या चित्रपटाची प्रदर्शनापूर्वीपासून चर्चा रंगली होती. या चित्रपटाची गाणी देखील प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळवत आहेत. त्यामुळं या आठवड्यात बॉक्स ऑफिसच्या मैदानावर पानिपत चित्रपट मोठी आघाडी घेणार का हे पाहण उत्सुकतेचं ठरणार आहे.