हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2022 साठी आज खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडत असून भारताचा दिग्गज खेळाडू शिखर धवन पंजाब किंग्सच्या ताफ्यात गेला आहे. शिखर धवनला तब्बल 8.25 कोटींमध्ये पंजाब ने विकत घेतले.
मागच्या मोसमानंतर धवनला दिल्ली कॅपिटल्सने रिलीज केलं, त्यानंतर शिखर धवन लिलावात उतरला. त्याची बेस प्राईझ 2 कोटी होती. शिखर धवन आत्तापर्यंत मुंबई इंडियन्स, दिल्ली मग हैदराबाद आणि पुन्हा दिल्लीकडून खेळला त्यानंतर आता पंजाब ने त्याला विकत घेतल्याने पंजाबची ताकद ही निश्चितच वाढली आहे.
शिखर धवन ने आत्तापर्यंत आयपीएल मध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याने 192 आयपीएल सामन्यांमध्ये 5,784 रन केले आहेत. धवनने लिलावासाठी त्याची बेस प्राईज 2 कोटी रुपये एवढी ठेवली आहे. आयपीएल 2019 मध्ये शिखर धवनने 520 तर आयपीएल 2020 मध्ये 618 रन केले, यानंतर मागच्या मोसमातही शिखर धवनची बॅट तळपली.