हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर भारतीय जनता पक्षाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची आज पुण्यतिथी.. त्यानिमित्ताने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांना आदरांजली वाहिली. पंकजा यांनी एक भावनिक पोस्ट शेअर करत प्रमोद महाजन यांच्याबद्दलच आपलं प्रेम व्यक्त केले.
पंकजा म्हणाल्या, घरातील कोणीही राजकारणात नसताना, शाखेचे पासून ते देशाच्या सर्वोच्च नेत्याचा लक्ष्मण हा प्रवास ज्यांनी बुद्धी आणि कष्टाच्या जोरावर गाठला,समता, ममता, जयललिता हे combination करून देशाच्या समोर अशक्य शक्य करून दाखवलेल्या त्या प्रमोद महाजनांच्या चरणी अभिवादन..
https://www.facebook.com/PankajaGopinathMunde/posts/3966001293485402
बाबा म्हणायचे “माझा (मुंडे साहेबांचा)लोकसंग्रह आणि प्रमोद चे मॅनेजमेंट हे ज्याच्यात आहे ,तो कुशल लीडर होतो” आज हे मार्गदर्शन मिळण्यापासून आम्ही मुकतो आहे. अशी पोस्ट शेअर करताना पंकजा मुंडे भावुक झाल्या.
कोण होते प्रमोद महाजन –
प्रमोद महाजन एक अद्वितिय दृष्टी लाभलेले नेते होते. प्रमोद महाजन यांचे राजकीय कौशल्य आणि त्यांनी राष्ट्रीय राजकारणात केलेल्या अनेक घडामोडी आजही अनेक राजकीय नेत्यांसाठी आदर्श आहेत. प्रमोद महाजन हे गोपीनाथ मुंडे यांचे म्हेवणे होते. भारतीय जनता पार्टी साठी त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. 26 एप्रिल 2006 ला प्रमोद महाजन यांचे भाऊ प्रवीण महाजन यांनी पूर्णा इमारतीतल्या राहत्या घरी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. उपचारादरम्यान 3 मे रोजी प्रमोद महाजन यांचा मृत्यू झाला.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.