बीड प्रतिनिधी । संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या महत्वाच्या निवडणुकी पैकी परळीतील धनंजय विरुद्ध पंकजा लढत होती. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. अखेर निकाल हाती आला असून, धनंजय मुंडे यांनी पंकजा यांचा दणदणीत पराभव केला आहे. हा निकाल समोर आल्यानंतर भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांनी आपला पराभव मान्य केला असून, ‘आपल्याला जनतेने दिलेला कौल मान्य’ असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान धनंजय यांनी मतमोजणीत मोठी आघाडी घेत विजय मिळवला आहे. आघाडीतून धनंजय मुंडे विजयी झाल्याने राष्ट्रवादी समर्थक विजयाचा जल्लोष साजरा करत आहेत. धनंजय मुंडे यांनी सुरवातीपासूनच मतांची आघाडी घेत पंकजा मुंढेंना पिछाडीवर टाकले होते. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा विजय निश्चित होता त्यामुळे कार्यकर्त्यांनी सुरवातीपासूनच विजय साजरा करण्यास सुरवात केली होती.