*भंगार भंगार… या समर्थकांच्या घोषणाबाजीमुळे संतापल्या पंकजा मुंडे; म्हणाल्या की,*

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने मुंडेंच्या समर्थकांनी राजीनामाही दिला होता. समर्थकांकडून केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्या विरोधातही घोषणाबाजी करण्यात आली होती. त्याचा प्रत्यय आज पुन्हा पहायला मिळाले. भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांची जनआशीर्वाद यात्रा पंकजा मुंडे यांच्या घरी पोहोचली. यावेळी मुंडे समर्थकांनी “भंगार भंगार…” अशी घोषणाबाजी केली.त्यावर पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांच्या या प्रकारावर चांगलाच संताप व्यक्त केला.

केंद्रीय मंत्री भागवत कराड यांची जन आशीर्वाद यात्रा भाजपनेत्या पंकजा मुंडे यांच्या घरी आज दाखल झाली. यावेळी त्याच्या घरासमोर मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी जन आशीर्वाद यात्रेचे स्वागतही केले. मात्र, या यात्रेत उपस्थित असलेले केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्या विरोधात व पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीमुळे पंकजा मुंडे या चांगल्याच संतापल्या. त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये जाऊन त्यांना सुनावले.

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या कि, “विरोधात काय घोषणा देताय, दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम, यात्रा आहे काय?, जेवढ्या मोठ्या उंचीची मी आहे तेवढीच उंची स्वताची ठेवा. माझ्या घराच्या दारात उभे राहून काय अंगार, भंगार घोषणा लावल्या आहेत. हि पद्धत आहे काय वागायची. मी असे संस्कार दिले आहेत काय? असे म्हणत पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना झापले आहे.

Leave a Comment