हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लवादाच्या बाबत सन्माननीय खा.शरद पवार साहेब यांचे मार्गदर्शन घ्यावे. संप हा मजुरांच्या हक्कासाठी आहे. माझे ऊसतोड कामगार हे राजकीय प्यादे नाहीत,’ असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावरून आक्रमक भूमिका घेतली आहे.
लवादाच्या बाबत अत्यंत अनुभवी सन्माननीय खा.शरद पवार साहेब यांचे मार्गदर्शन घ्यावे..
संप हा मजुरांच्या हक्कासाठी आहे कोणाचीही राजकीय पोळी भाजण्यासाठी नाही..
माझे ऊसतोड कामगार हे राजकीय प्यादे नाहीत..— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 21, 2020
ऊसतोड मजुरांच्या मागण्या मान्य करा अन्यथा कोयता हातात घेऊन ऊसतोड मजूर रस्त्यावर येईल. संप फोडण्याचा प्रयत्न केला तर संघटना आक्रमक होईल. तसंच हातात कोयते घेऊन सरकारला व कारखानदाराला सळो की पळो करून सोडू, असा इशारा यावेळी सरकारला दिला.
ऊसतोड कामगार महामंडळा कडे असणारे विषय हाताळण्यासाठी धनंजय मुंडे ना ही बैठकी ला बोलवावे व जवाबदारी निश्चित करावी. सरकार पातळीवर आणखी मंत्री महोदय उदा.आरोग्य मंत्री, कामगार मंत्री, महिला व बाल कल्याण यांना ही बोलवावे..
(१/२)— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 21, 2020
ऊसतोड कामगार महामंडळाकडे असणारे विषय हाताळण्यासाठी धनंजय मुंडे यांनाही बैठकीला बोलवावे व जवाबदारी निश्चित करावी. या सोबतच आरोग्यमंत्री राजेश टोपे, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, महिला बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनाही आमंत्रित करावे व अंतिम निर्णय लवादाने घ्यावा अशा सूचना साखर संघाच्या बैठकीत पंकजा मुंडेंनी केल्या.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’