“कंपनीविरुध्द तक्रार करणे म्हणजे सूड नाही”: नारायण मूर्ती

हॅलो महाराष्ट्र । जर व्हिसल ब्लोअर व्यक्तीने योग्य ते पुरावे देऊन आपले दावे मांडले तर त्याचा सूड म्हणून विचार केला जाऊ नये. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसचे सह-संस्थापक एनआर नारायणमूर्ती यांनी हे सांगितले आहे. 21 सप्टेंबर रोजी अखिल भारतीय व्यवस्थापन संघटनेच्या 47 व्या राष्ट्रीय व्यवस्थापन अधिवेशनात नारायणमूर्ती म्हणाले, “जर कोणी पुराव्यांसह व्हिसल ब्लोअर बॉसचा मुद्दा मांडत असेल तर कंपनीने त्याला पूर्ण सुरक्षा द्यावी.”

जर व्हिसल ब्लोअर पारदर्शकपणे तक्रार करत असेल तर कंपनीच्या बोर्डाने कंपनीची प्रतिष्ठा वाचविली पाहिजे आणि आपली कर्तव्ये पार पडली पाहिजे. कंपनी बोर्डाचे हे एक महत्त्वपूर्ण कार्य आहे.

ते म्हणाले की,’मध्यम किंवा निम्न स्तरावरील कर्मचार्‍यांविरोधात कोणतीही तक्रार आल्यास त्यासाठी अंतर्गत समिती नेमली पाहिजे. त्यामध्ये आरोपींशी संपर्कात नसतील अशा सिनिअर कर्मचार्‍यांचा समावेश असावा आणि त्यांनी केलेले दावे तपासण्यासाठी हे पुरेसे आहे.

बोर्ड स्वतः निर्णय घेऊ शकत नाही
ते पुढे म्हणाले की जर अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा कार्यकारी संचालकांसह इतर कोणत्याही बोर्डाच्या सदस्यांविरोधात तक्रार आल्यास बहुतेक मंडळे विद्यमान नियम कायद्याच्या आधारे स्वतःच याची तपासणी करतात … ही कल्पना योग्य नाही कारण जज, ज्युरी आणि अभियुक्त होऊ शकत नाही.

इन्फोसिसमध्ये अशी प्रकरणे समोर आली आहेत
2018 मध्ये इन्फोसिसच्या कॉर्पोरेट कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून एका व्हिसल ब्लोअरने सह-संस्थापक नंदन निलेकणी यांच्यावर अनेक आरोप केले होते. मागील मंडळाने केलेल्या चुकीच्या कामांना लपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप निलेकणी यांच्यावर होता. तसेच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सेबीला तक्रारदाराने एक पत्रही लिहिलेले होते.

यानंतर ऑक्टोबर 2019 मध्ये एका व्हिस्लो ब्लोअरने सीईओ सलील पारेख आणि सीएफओ निलंजन रॉय यांच्यावरही अकाउंटिंग अनियमिततेचा आरोप केला होता. देशातील दुसर्‍या क्रमांकाच्या आयटी कंपनीने यानंतर सविस्तर अहवाल जाहीर केला. ऑडिट कमिटीच्या तपासणीनंतर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. यानंतर कंपनीला क्लिनचिट देण्यात आली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like