पानसरे हत्याप्रकरणाच्या तपासात मागील सरकार कमी पडल- गृहराज्यमंत्री सतेज पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
गेल्या पाच वर्षात कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात हायकोर्टाला हस्तक्षेप करावा लागला… हा तपास कसा चाललाय त्यात व्यवस्थितपणा आहे का ? या प्रत्येक गोष्टीवर हायकोर्ट मॉनिटरिंग होतं म्हणजे शासन कमी पडल आहे हे स्पष्ट दिसतंय अस सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. ते कोल्हापूरात बोलत होते. पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पकडणं आणि हा तपास लॉजिकल आणला एन्ड ला पोहोचवणं आणि कारवाई करणे ही आता शासनाची जबाबदारी आहे. दर आठवड्याला या प्रकरणाच्या तपासाचा माझ्या स्तरावर आढावा घेणार असल्याचं गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाला पाच वर्ष झाली तरी मारेकरी सापडत नाहीत म्हणून पानसरे कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच आज निर्भय मॉर्निंग वॉक देखील काढण्यात आला होता. यामध्ये ज्येष्ठ विचारवंत एन डी पाटील सहभागी झाले होते. पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासाबाबत राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी हा तपास गांभीर्याने करत असल्याचेही सतेज पाटील यांनी म्हटलं.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment