कोलकाता | पश्चिम बंगाल येथे पॅराग्लाइडिंग दरम्यान दोर तुटून भयंकर अपघात झाला आहे. यामधे नेपाळी पर्यटक गंभीर जखमी झाला असून पॅराग्लायडींग पायलट मृत्युमुखी पडल्याचे वृत्त आहे. धक्कादायक म्हणजे सदर अपघाताचा संपुर्ण व्हिडीओ पर्यटकाच्या मोबाईल मधे कैद झाला असून तो सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, नेपाळी पर्यटक पॅराग्यायडींगचा आंनद घेत असताना अचानक दोर तुटल्याने हा अपघात झाला असल्याचे समोर आले आहे. ग्लायडर विमानात तात्रिक बिघाड झाल्याने तार तुटून पायलट आणि पर्यटक असे दोघेही जमिनिवर कोसळले. त्यानंतर दोघांनाही तातडीने उपचारासाठी रुग्नालयात दाखल करण्यात आले. मात्र डाॅक्टरांनी पायलट पुरुषोत्तम यांना मृत घोषीत केले तर पर्यटक गौरव चौधरी गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान हा सगळा थरार चौधरी याच्या सेल्फी केमेर्यात कैद झाला आहे. सुदैवाने दोर तुटली तेव्हा दोघेही काही हजार फुटांवर होते त्यामुळे चौधरी यांचा प्राण वाचू शकला. पायलट पुरुषोत्तम यांनी पर्यटकाला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तेच त्यांच्या जीवावर बेतले असे व्हिडीओत दिसत आहे.