हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 2010-11 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात परभणी – परळी रेल्वे (Parbhani – Parli Railway) मार्गाचे दुहेरीकरण होणार असे सांगितले होते. तेव्हापासून रखडलेला हा प्रकल्प आता मार्गाला लागणार आहे. यासाठी दिल्ली बोर्डाने दक्षिण मध्य रेल्वे विभागातील सिकंदराबादच्या जनरल मॅनेजरला लेखी पत्र देत याबाबत निधी मंजूर झाल्याचे कळवले आहे. त्यामुळे प्रवाश्यांसाठी ही आनंदाची बातमी मानली जात आहे. 2010-11 च्या अर्थसंकल्पामध्ये या मार्गाच्या दुहेरकरणाचा उल्लेख होता. परंतु या कामासाठी प्रत्यक्ष निधी न मिळाल्यामुळे हे काम तसेच रखडले गेले. त्यामुळे कामही अपूर्णच राहिले होते. मात्र आता या कामासाठी तब्बल 769 करोड 96 लाखाचा निधी मिळाला आहे. त्यामुळे हे काम आता लवकरच पूर्ण होईल अशी आशा आहे.
मुदखेड ते परभणी मार्गाचे दुहेरीकरणाचे काम पूर्ण- Parbhani – Parli Railway
सध्या दक्षिण मध्य रेल्वे विभागातील अनेक मार्गावर दुहेरीकरणाचे आणि विद्युतीकरणाची कामे जलदगतीने पूर्ण केली जात आहेत. त्यामुळे यामधील मुदखेड ते परभणी मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. सध्या या मार्गावर आता या मार्गावर विद्युतीकरणाची कामे सुरू आहेत. त्यामुळे लवकरच परभणी – परळी मार्ग पूर्ण होईल.
किती आहे अंतर?
परभणी जंक्शन येथून पूर्णा, जालना सोबतच परळीकडे जाणारा हा मार्ग आहे. त्यामुळे परभणी – परळी या रेल्वे (Parbhani – Parli Railway) मार्गाचे एकूण अंतर हे 64.71 किलोमीटर इतके असून या मार्गावर रोज 15 ते 20 रेल्वे धावतात. तसेच मालगाड्यांचीही वर्दळ येथे असते. या मार्गावर सध्या विदयुतीकरणाकचे काम सुरु आहे. त्यामुळे लवकरच दुहेरीकरणास मार्ग मोकळा होणार आहे.
का गरजेचे आहे हे दुहेरीकरण?
दक्षिण रेल्वे विभागाने याबाबत 10 नोव्हेंबरला अधिसूचना काढल्या होत्या. या 64.71 किलोमीटरचे काम पूर्ण करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील सोनपेठ, गंगाखेड व परभणी या तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी आणि भूसंपादन अधिकारी यांना अधिसूचनेद्वारे कळविण्यात आले होते. त्यानंतर पंधरा दिवसांतच या कामास फायनान्स डिरेक्टोरेट रेल्वे विभागाने निधीला मंजुरी दिली आहे. परभणी -परळी येथून रोज अनेक गाड्या प्रवाश्यांची ने – आन करतात. त्याचबरोबर मालगाड्या देखील येथे धावतात. मालगाड्या यासाठी की यांच्याद्वारे परळी येथील थर्मल पॉवर स्टेशनसाठी लागणाऱ्या कच्च्या कोळशाची ने – आन केली जाते. त्यामुळे या मार्गावर दुहेरीकरण (Parbhani – Parli Railway) होणे अत्यंत आवश्यक आहे.