परभणी प्रतिनिधी । परभणी येथील रेल्वे स्थानकाच्या जुन्या इमारतीत असणाऱ्या द्वितीय श्रेणी प्रतिक्षालयाला सायंकाळी पाचच्या दरम्यान मोठी आग लागल्याची घटना घडली. यामध्ये या हॉल मधील सर्व साहित्य जळून खाक झाल आहे. सलग दुसऱ्या दिवशी ही हा आगीचा प्रकार घडला आहे.
परभणी मध्ये बुधवारी संध्याकाळी आगीच्या घटनेमध्ये एटीएम जळून खाक झाल्यानंतर आज पुन्हा आगीची घटना घडलीये. यावेळी परभणी येथील रेल्वे स्टेशनमध्ये आग लागली होती. रेल्वे स्थानकातील जुन्या इमारतीमध्ये असणाऱ्या द्वितीय श्रेणी प्रतिक्षालयाच्या हॉलमध्ये ही आग लागली. ५ वाजता लागलेल्या या आगीने आग बघता बघता रुद्ररूप धारण केलं.
यावेळी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आल्याने १५ ते २० मिनिटे परिश्रम केल्यानंतर ही आग आटोक्यात आली. दरम्यान आगीचे कारण कळू शकले नाही. यावेळी रेल्वेस्थानक परिसरामध्ये सर्वत्र धुराचे लोट पसरले होते. तर प्रवासी व बघ्यांनी याठिकाणी घटना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. दरम्यान गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना याठिकाणी कसरत करावी लागली.