परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
परभणी जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका बसला असून रविवारी संध्याकाळी झालेल्या पावसाने रब्बी पिकांसह व फळबागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शनिवार दि. १ फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील हवामानामध्ये अचानक बदल होत ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. त्यातच रविवारी दिवसभर ऊन-सावल्यांचा खेळ राहिल्यानंतर सायंकाळच्या वेळी काळेकुट्ट ढग जमा होत संध्याकाळी ७ वाजेनंतर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पावसाच्या सरी पडायला सुरुवात झाली. तर परभणी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. जिल्ह्याच्या इतर ग्रामीण भागातही कमी-अधीक प्रमाणात पावसाने हजेरी लावली.
सध्याच शेत शिवारामध्ये रब्बी हंगामातील ज्वारी ,हरभरा, गहू इत्यादी पिके उभे आहेत. ऊस हंगाम सुरू असल्याने ऊस तोडणी चालू आहे. रविवारी रात्री झालेल्या पावसाने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचं चित्र पाहायला मिळाले . यावेळी फळबागांमध्ये अवकाळी पावसामुळे फळगळ झाल्याचे दिसून आले. सध्या खरिपातील तूर काढणीला आली असून शेतकरी या कामात व्यस्त आहेत. शेतात उघड्यावर ठेवलेल्या तुरीच्या कडप्यांचे ढिगारे कालच्या पावसाने भिजली आहेत. त्यातच आज दिवसभर ही आकाशात ढगांनी गर्दी केलेली आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे.
मागील अनेक वर्षापासून जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि त्यातून शेतीचे होणारे नुकसान असे समीकरण झाले आहे. त्यामुळे पेरणी केलेले पीक हाती येईल की नाही अशी भीती शेतकरी वर्गात मागील अनेक वर्षापासून तयार झाली आहे .या वर्षी तरी खरीप व रब्बी हंगाम चांगल्या पद्धतीने हाती येईल अशी आशा शेतकऱ्यांना होती.परंतु खरिपामध्ये परतीच्या पावसाने दगा दिल्या नंतर आता हातातोंडाशी आलेल्या रब्बी हंगामावर अवकाळी पावसाचे सावट दाटून आले आहे.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.
हे पण वाचा-
ज्यांची संस्कृती कट्टा ठेवणाऱ्यांची आहे अशांना सत्याग्रह कसा कळणार? काँग्रेसची भाजपवर टीका
मुख्यमंत्र्यांची मुलाखत बालिश वाटते; नारायण राणेंची घणाघाती टीका