परभणीत राजेश विटेकरांचा मनोमिलन पॅटर्न यशस्वी..

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
पक्षांतर्गत धुसफूस कमी करण्यात यश

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

परभणी जिल्हातील सर्वच पक्षात असणारे गटातटाचे राजकारण व पक्षांतार्गत मतभेद आता मिटवण्याचे काम चालू आहे. एकीकडे आघाडीचे उमेदवार राजेश विटेकरांनी पाथरी मनोमिलन बैठक घेत पॅचअप घडवून आणलं आहे. एक दिलाने काम करत पाथरी मतदार संघातून मताची सर्वाधिक लीड देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला आहे.

दुसरीकडे भाजपमध्ये प्रवेश केलेले जिंतूरचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व लोकसभा निवडणुक लढवण्यास तीव्र इच्छूक असणाऱ्या त्यांच्या कन्या मेघणा बोर्डीकर यांनी एक युतीतील बंडाची सोमवारी मार्च रोजी कार्यकर्त्यांची बैठक घेत लोकसभा लढणार असल्याचे स्पष्ट केली. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांची लक्षणीय उपस्थिती असल्याने बोर्डीकरांची भूमिका राजेशदादा विटेकर या आघाडीच्या उमेदवाराच्या पथ्यावर पडून शिवसेनेचे उमेदवार खा .संजय जाधव यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार असे सध्या चित्र निर्माण झालं आहे.

एकोणीस लाख मतदार, एकविसशे बूथ, पंधराशे लहान मोठी गावे असा लोकसभा मतदार संघ असल्याने प्रत्येक ठिकाणी कमी कालावधीत पोहचणे शक्य नाही. प्रत्येक कार्यकर्त्याने जर मीच खासदार या प्रमाणे कार्य केले तर जिल्हात परिवर्तन नक्की होईल. खासदार झाल्यावर सर्वांना सन्मानाची वागणूक देण्याचा आणि जिल्हाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहन्याचं आश्वासन राजेश विटेकर यांनी केलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जुनेद दुर्राणी यांनी केले, यावेळी आ . बाबाजानी दुर्राणी, सुरेश वरपुडकर, तुकारामजी रेंगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं.

लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

लोकसभा निवडणुकीत भाजप उतरवणार या स्टार उमेदवारांना रिंगणात

इथून लढवू शकतात रोहित पवार विधानसभा निवडणूक

आधी लोकसभा निवडणूक जिंका, नंतर पंतप्रधान शोधा – शरद पवार

रोहित पवार आगामी लोकसभेत शिवसेनेच्या आढळरावांना पुरून उरणार?

शरद पवार पुण्यातून लढवणार लोकसभा ?