परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
मागील काही दिवसापासून परभणी जिल्ह्यात कोरोना संसर्गाने बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सातत्याने संचारबंदीत वाढ करण्यात येत आहे .आठवड्यातील प्रत्येक शनिवार व रविवार संचारबंदी यापूर्वीच घोषित करण्यात आले असुन तालुकानिहाय वाढत असलेल्या रुग्ण संख्येने वेळोवेळी संचारबंदी जिल्हाधिकारी करीत आहेत. अशातच कोरोना संसर्गातून पूर्णतः बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही दिडशे वर पोहोचल्याची दिलासादायक बातमी जिल्हावासीयांंसाठी आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३१०रुग्ण कोरोनाबाधित आढळले असून १४९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ९ कोरोना बाधित मृत्यूमुखी पडले आहेत. तर रुग्णालयातील संक्रमीत कक्षात १५२ रुग्ण उपचार घेत आहेत. १६ जुलै रोजी ८ पॉझिटीव्ह रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत एकूण ३६८० संशयित रुग्ण दाखल झाले असून संसर्गजन्य कक्षात ९९७, विलगीकरण केलेले ५७९ व विलगीकरणाचा चौदा दिवसांचा कालावधी पूर्ण झालेले २८१० एवढे रुग्ण आहेत. एकूण ३९१९ संशयितांचे स्वॅब घेतल्या गेले असून त्यातील ३२८३स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. तर ३०७ स्वॅब पॉझीटीव्ह आले आहेत. ११० स्वॅब अनिर्णायक असून ४८ स्वॅब तपासणीस आयोग्य ठरले आहेत. १७१ स्वॅबच्या अहवालाची प्रतिक्षा कायम आहे.