परभणी जिल्ह्यात कोरोनानंतर सारीचे नवे संकट; पन्नास वर्षीय मजुराचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे

जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पाठोपाठ आता नवीन संकट उभे राहिले असून शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झालेला मजुर व्यक्ती आज सकाळी सारी रोगाने ग्रस्त असल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

गंगाखेड परभणी रस्त्याचे काम करणारा एक पन्नास वर्षीय मजूर व्यक्ती ताप येत असल्याचे लक्षण असल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयातील असोलेशन वार्ड मध्ये उपचार घेत होता .उपचारा दरम्यान आज सकाळी आठ वाजता त्याचा मृत्यू झालाय. सदर व्यक्तीचा मृत्यू सारी रोगाचा जिल्ह्यातील पहिला बळी असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

सदर घटनेमुळे जिल्हावासियांच्या चिंतेत भर पडली आहे. गंगाखेड तालुक्यातील महातपुरी फाट्यावर हा व्यक्ती वास्तव्यास असल्याचे माहिती मिळत आहे. त्याच्यासोबत इतरही सात जण काम करत होते ,अशीही माहिती मिळत आहे. त्यामुळे त्या सातही जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. संपर्कातील आणखी १३ व्यक्तींना तात्काळ क्वारंटाईन करण्यात आल्याचे प्रशासनाकडून
सांगण्यात आले आहे.