परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
जिल्ह्यातील राजकारणात वेगळं स्थान व उंची असणाऱ्या वरपुडकर कुटुंबांने लॉकडाऊनच्या कठीण काळात सामाजीक बांधिलकी जोपासत गरजु लोकांना मदतीचा हात पुढे केला असुन चार तालुक्यात अन्न पुरवण्याची स्तुत्य व्यवस्था केली आहे. यावेळी पहिल्या दिवशी १५०० अन्नपाकीटांचे वाटप करण्यात आले आहे .
मागच्या सहा दिवसापासून जगभर आरोग्य संकट होत, थैमान घातलेल्या कोव्हीड-१९ चा संसर्ग थांबवण्यासाठी उपाययोजना म्हणुन संपूर्ण देशात लाॅकडाउन आहे. या काळात अनेक बेघर, अनाथ आणि ज्या कुटूंबाचा उदरनिर्वाह हातावरच आहे अशांची तारांबळ उडाली आहे. त्यांना एकवेळचे जेवण मिळणे कठीण झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. हि जाणीव समाजातील दानशुर व्यक्तींना झाल्यानंतर त्यांना पाझर फुटला असुन मदतीचे हात ही आता पुढे येत आहेत. त्यात परभणी जिल्हातील राजकीय कुंटूब अशी ओळख असणारे वरपुडकर कुटूंबीय ही पुढे आल्याचे दिसत आहे.
शनिवार दि २८ मार्च रोजी परभणी जिल्हा रुग्णालयातील रूग्णांना व सोनपेठ शहरातील गरजू कुटुंबांना १५०० अन्न पॅकेट पुरवण्याची व्यवस्था वरपुडकर कुटूंबीयांनी अत्यंत नियोजन पुर्वक केली. अन्न वाटपाचे नियोजन काळजीपुर्वक होण्यासाठी त्यांनी युवकांची टिम तयार केली असुन रविवार पासून लाॅकडाउनच्या संपुर्ण काळात पाथरी, मानवत, सोनपेठ तिन्ही तालुक्याच्या ठिकाणी अन्न वाटपाचे नियोजन करण्यात आल्याचे युवा नेत्या प्रेरणा वरपुडकर यांनी हॅलो महाराष्ट्रशी बोलतांना सांगितल आहे.
आ. सुरेश वरपुडकर, माजी महापौर मीनाताई वरपुडकर व कृ.उ.बा.समितीचे सभापती समशेर वरपुडकर यात वैयक्तिक लक्ष देत असल्याचेही प्रेरणा वरपुडकर यांनी माहीती दिली आहे. कोरोनाशी लढा देत असताना बचाव व काळजी करत घरी बसणे योग्य असले तरि आर्थिक दृष्ट्या सक्षम कुंटूबांनी अडचणीच्या काळात वरपुडकर परिवार प्रमाणे मदतीसाठी पुढे येण्याचीही गरज निर्माण झाली आहे.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 79726 30753 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.