‘माझी पक्षात घुसमट होतेय!’ सांगत तृणमूलच्या खासदराचा राज्यसभेतच राजीनामा; ममता बॅनर्जींना धक्का

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । राज्यसभेतील तृणमूल काँग्रेसचे खासदार दिनेश त्रिवेदी यांनी अतिशय नाट्यपूर्ण पद्धतीनं संसदेतच आपला राजीनामा सोपवला. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान दिनेश त्रिवेदी यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत तृणमूल काँग्रेसचे सदस्य खासदार दिनेश त्रिवेदी यांनी सहभाग घेतला. दिनेश त्रिवेदी यांना बोलण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत अचानक राजीनामा देत असल्याची घोषणा केली. ”प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा त्याला आपल्या अंतरआत्म्याचा आवाज ऐकू येतो. अध्यक्ष महोदय, माझ्याही आयुष्यात आज अशीच वेळ आलीय. मी माझ्या पक्षाचा आभारी आहे ज्यांनी मला इथे पाठवलं आहे. पण आता मला इथे घुटमळतंय. तिथे अत्याचार सुरु असताना आम्ही काहीही करू शकत नाहीत. म्हणून माझा आतला आवाज सांगतोय की इथे चूपचाप बसून रहा आणि काहीही बोलू शकत नसाल तर राजीनामा हाच सर्वोत्तम मार्ग आहे”’असं म्हणत दिनेश त्रिवेदी यांनी आपला राजीनामा सादर केला.

गेल्या अनेक दिवसांपासून दिनेश त्रिवेदी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देतील, असा कयास होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश त्रिवेदी लवकरच तृणमूल काँग्रेसमधून राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. दिनेश त्रिवेदी यांनी भर राज्यसभेत बोलताना केलेली राजीनाम्याची घोषणा ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी शुभेंदू अधिकारी, मुकुल घोष, राजीव बॅनर्जी यांसारख्या बड्या नेत्यांनी तृणमूल काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

Leave a Comment