दुधारू जनावरांचा विमा काढल्यास मिळणार 88 हजार रुपये नुकसान भरपाई, जाणून घ्या किती असणार प्रिमिअम

animal
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारतातील ग्रामीण भागात शेतीबरोबरच पशुपालन देखील उपजीविकेचे मोठे साधन आहे. मात्र अनेकदा गंभीर आजारांमुळे जनावरांचा मृत्यू होतो. अशावेळी शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागतो आणि उपजीविकेचे साधन देखील संकटात येते. मात्र अशा संकटाच्या काळात पशुपालकांसाठी असणारी विमा योजना (pashudhan beema yojana) त्यांच्या फायद्याची ठरू शकते.

या प्राण्यांचा करू शकता विमा
अनेक राज्यांमध्ये दूध देणाऱ्या जनावरांचा विमा केला जातो. यामध्ये गाय, म्हैस, बैल, घोडा, उंट, गाढव, खच्चर आणि सांड यांचा विमा शेतकरी करू शकतात. यासाठी 25 ते 300 रुपयांचा प्रिमिअम असतो. या मोठ्या जनावरांबरोबरच शेळी, मेंढी, ससा आणि डुकराचा विमा करू शकतात. प्रत्येक शेतकरी परिवार आपल्या 5 पशुधनाच्या (pashudhan beema yojana) युनिटचा विमा करू शकतात. यामध्ये एका युनिटमध्ये 1 मोठे जनावर किंवा 10 छोटे जनावर येतात. यामध्ये विमा केल्यास एका जनावराच्या मृत्यूवर शेतकऱ्याला जास्तीतजास्त 88 हजार रुपये नुकसान भरपाई मिळू शकते.

एवढा द्यावा लागणार प्रिमिअम
या योजनेत अनुसूचित जातीचे पशुपालक आपल्या जनावरांचा विमा (pashudhan beema yojana) निःशुल्क करू शकतात. बाकी जनावरांमध्ये त्यांच्या दूध देण्याच्या क्षमतेनुसार 100 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत विमा द्यावा लागतो.यामध्ये छोट्या जनावरांसाठी केवळ 25 रुपयांमध्ये विमा निघतो.

पशुधन विमा कव्हरेज
यामध्ये विमा काढलेल्या जनावरांचा (pashudhan beema yojana) आजाराने किंवा एखाद्या दुर्घटनेत किंवा आकस्मित मृत्यू झाल्यास विमा मिळेल. यामध्ये विमा काढल्यानंतर 21 दिवसांनी त्याचा कालावधी सुरु होईल. यामध्ये गाईचा मृत्यू झाल्यास 83 हजार तर म्हशीचा मृत्यू झाल्यास जास्तीतजास्त 88 हजार रुपये नुकसान भरपाई मिळेल. याचबरोबर लहान जनावरांचा मृत्यू झाल्यास 10 हजार रुपये भरपाई मिळेल.

हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या