हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रेल्वेने प्रवास करायचा म्हंटल की, अनेकजण खूप उत्सुकतेने त्याची वाट पाहत असतात. त्यातल्या त्यात ट्रेन ही निसर्गाच्या सानिध्यातून, ट्राफिकच्या गर्दीतून मुक्त असते. त्यामुळे अनेकजण यास जास्त प्राधान्य देतात. यासाठी नेरळ माथेरानला फिरण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी मिनी ट्रेन सुरु करण्यात आली आहे. यास प्रवाश्यांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. मात्र या रेल्वेच्या फेऱ्या कमी असल्यामुळे अनेकजण या संधीपासून वंचित राहत आहेत.
रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्याची होतेय मागणी
मिनी ट्रेनच्या फेऱ्या या सद्य स्थितीला केवळ दोनच होत असून त्यामुळे प्रवाशांना ही सेवा मिळत नाहीये. त्यामुळे अनेकांकडून या ट्रेनच्या फेऱ्या वाढवण्याबाबत मागणी केली जात आहे. मात्र रेल्वे बोर्डाने याबाबत भौगोलिक परिस्थिती पाहता जस शक्य आहे तशी सेवा देण्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या ट्रेनच्या फेऱ्या वाढणे थोडेसे कठीण दिसून येत आहे. रेल्वे बोर्डाने सांगितल्याप्रमाणे या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती तसेच हा ट्रॅक मुळात एका कठीण जागेवर तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या गाडीच्या सेवेला मर्यादा घालण्यात आल्या आहेत.
का वाढते आहे याचे आकर्षण?
मिनी ट्रेनचा प्रवास करण्यासाठी देश – विदेशातून अनेक पर्यटक येत असतात. तसेच नेरळ ते माथेरान हा भाग निसर्गाने वेढलेला आहे. त्यामुळे येथील सौन्दर्य हे डोळ्याचे पारणे फेडतात. त्यात भरीस भर म्हणून सध्या हिवाळा सुरु आहे. सध्या येथील वातावरणात एक वेगळाच आनंद बघायला मिळतो म्हणून अनेक पर्यटक येथे जाऊ इच्छितात. मात्र मिनी ट्रेनची व्यवस्था व्यवस्तीत नसल्यामुळे अनेक पर्यटक नाराज होताना दिसत आहेत.
कशी आहे ही गाडी?
या एका मिनी ट्रेनमध्ये एकावेळी द्वितीय श्रेणीतून 90 तर प्रथम श्रेणीतून 30 असे प्रवासी प्रवास करू शकतात. मात्र असे जरी असले तरी या ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी हजारो पर्यटक येत असतात. परंतु याच्या केवला दोनच फेऱ्या होतात. 2018 साली या एका मिनी ट्रेनच्या फेरीला 2 तास 50 मिनिटे लागत होती. ती आताही तेवढीच लागतात. असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.