हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज 19 डिसेंबर 2023 रोजी दुबईमध्ये IPL 2024 चा लिलाव झाला आहे. यंदाच्या IPL लिलावामध्ये 333 खेळाडू सहभागी झाले होते. आजच्या या लिलावात चेन्नई आणि मुंबईने पॅट कमिन्सला तब्बल 20.5 कोटी रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले आहे. त्यामुळे पॅटकमिन्स आयपीएलच्या इतिहासातील आजवरचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. तसेच, हर्षल पटेलला 11.75 कोटींना पंजाब किंग संघाने खरेदी केले आहे. या खेळाडूंबरोबर इतर खेळाडूंना देखील बक्कळ बोलीवर आपल्या ताफ्यात घेण्यात आले आहे. याचाच एक आढावा आपण घेऊयात.
पॅट कमिन्स – सनरायझर्स हैदराबादच्या संघाने इतिहासात विक्रम रजत पॅट कमिनला 20.5 कोटींना संघात घेतले. पॅट कमिन्सवर दोन कोटींपासून बोली लावण्यात आली होती.
हर्षल पटेल – पंजाब किंग संघाने हर्षल पटेल वर 11.75 कोटींची बोली लावत आपल्या ताफ्यात घेतले आहे. आज हर्षल पटेलसाठी गुजरात आणि पंजाब दोन्ही संघांकडून जोरदार बोली लावण्यात आली.
गेराल्ड कोएत्झी – मुंबई इंडियन्सने गेराल्ड कोएत्झीला पाच कोटी रुपयांना खरेदी केले आहे. सुरुवातीला गेराल्डवर दोन कोटींची बोली लावण्यात आली होती.
अझमतउल्लाह उमरजाई – गुंजत टायटन्स संघाने अझमतउल्लाह उमरजाई याला 50 लाख रुपयांना खरेदी केले आहे.
शार्दूल ठाकूर – चेन्नई सुपर किंगने शार्दूल ठाकूरला चार कोटींची बोली लावत खरेदी केले आहे.
रचिन रवींद्र – चेन्नई सुपर किंग्जनेच रचिन रवींद्रला देखील 1.8 कोटींची बोली लावत खरेदी केले आहे.
वानिंदू हसरंगा – हैदराबाद संघाने वानिंदू हसरंगावर 1.50 लाखांची बोली लावत आपल्या संघात घेतले आहे.
आजच्या लिलावामध्ये मनीष पांडे, स्टीव्ह स्मिथ, करूण नायर अनसोल्ड राहिले आहेत.
ट्रेव्हिस हेड – हैदराबादच्या संघाने 6 कोटी 8 लाखांना ट्रेव्हिस हेडला खरेदी केले आहे.
हॅरी ब्रुक – दिल्ली कॅपिटल्सने हॅरी ब्रुकला 4 कोटींना खरेदी केले आहे.