सकलेन मुलाणी । सातारा प्रतिनिधी
पाटण तालुक्यातील खालची आंबेकर येथे भुसक्कालन होऊन तीन कुटुंबातील 14 ते 15 लोक जमिनीखाली दबल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी समोर आली होती परंतु मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या पावसामुळे व या गावाकडे जाणारा रस्ता वाहून गेल्याने मदत कार्यात अडथळा येत होता मात्र शनिवारी सकाळी पाऊस थांबल्यानंतर एनडीआरएफच्या टीमसोबत स्थानिकांच्या मदतीने शोध कार्य सुरू करण्यात आले.
या ठिकाणी सकाळी सहा जणांचे मृतदेह ताब्यात सापडून मिळाले होते तर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आणखीन दोन मृतदेह सापडले असून एकूण आठ मृतदेह मिळाले आहेत घटनास्थळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासह प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेट दिली
खालचे आंबेघर दुर्घटना झालेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ती डोंगराचे भाग कोसळले असून अद्याप शोध कार्य सुरू आहे. सध्या आठ जणांचे मृतदेह हाती लागले असून अजून सात ते आठ लोकांचा शोध सुरु आहे