हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पटियाला हाऊस कोर्टाने निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही दोषींच्या फाशीवर बंदी घालण्यास नकार दिला आहे. या चौघाही आरोपींना उद्या सकाळी 6 वाजता फाशी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर, आज, सर्वोच्च न्यायालयाने पवन गुप्ताची क्युरेटिव याचिका आणि मंगळवारी फाशी थांबविण्याची याचिका फेटाळून लावली आहे. या निर्णयानंतर निर्भयाच्या आईने ‘या दोषींनी न्यायालयाचा बराच वेळ वाया घालवला आहे आणि आता उद्या या सर्वांना फाशी द्या,’ अशी प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चौथा दोषी पवन गुप्ता यालाही सर्वोच्च न्यायालयाकडून धक्का बसला आहे, न्यायालयाने क्युरेटिव याचिका फेटाळली. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने फाशी निर्णयावर बंदी घालण्यास नकार दिला आहे. सोबतच या प्रकरणाची खुल्या न्यायालयात सुनावणीची मागणीही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने सभागृहात विचार करून निर्णय घेतल्याने या याचिकेला कोणतेही आधार नसल्याचे खंडपीठाने म्हटले आहे.
दोषी पवनने उद्या देण्यात येणाऱ्या फाशीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे ज्यावर न्यायमूर्ती एम.व्ही.रमना, न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती आर.एफ. नरिमन, न्यायमूर्ती आर बनुमती आणि न्यायमूर्ती अशोक भूषण हे विचार करतील. अन्य तीन दोषी अक्षय, विनय, मुकेशची यांची क्युरेटीव याचिका आणि राष्ट्रपतींसमोर दाखल केलेली दया याचिका यापूर्वीच फेटाळून लावण्यात आली आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाचा धक्का बसल्यानंतर पवन याने आता राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला आहे. अशी माहिती दोषींचे वकील ए.पी. सिंह यांनी दिली.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.