सातारा प्रतिनीधी । जगात कोव्हीड १९ या संसर्गजन्य रोगाच्या माहमारीचा पादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे . देशभर लाॅकडाऊन सुरु असुन महाराष्ट्र राज्याचे प्रशासन प्रयत्नाची पराकाष्टा करत आहेत . सातारा जिल्ह्यात कोरोनाचे २२ रुग्न सापडले आहेत . यामध्ये जावलीचे सहा रुग्न आहेत . प्रशासनाला वेळीच मदत म्हणुन जावलीचे सुपुत्र राष्ट्रवादीचे जिल्हापरीषद सदस्य दिपक पवार , जेष्ठ नेते साहेबराव पवार व त्याचे बंधु सुधीर पवार यांनी मेढा ( जवळवाडी ) येथील मेरुलिगं शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयाची इमारत विलगीकरणाकरीता तहसिलदार शरद पाटील याच्याकडे सुपुर्द केली . जावलीच्या सुपुत्राची माहमारीमध्ये जावलीकरीता दिलेली मदत मोलाची असुन . प्रशासनाला रुग्नाच्या वाढत्या संख्येमुळे विलगीकरणाचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे.
जावली तालुका कोरोनाचा हाॅटस्पाॅट बनला असुन निझरे व म्हाते मुर्हा येथे एकुन सहा रुग्न कोव्हीड १९ चे सापडले आहेत . जावली तालुक्यांचे सुपुत्र दिपक पवार , जेष्ठ नेते साहेबराव पवार व सुधीर पवार यांची मेरुलिंग शिक्षण संस्थेची फार्मसी महाविद्यालयाची सुमारे ५० हजार स्केअर फुटाचा इमारत जावली तालुक्याच्या महसुल विभागाला कोव्हीड १९ यासंसर्गजन्य माहमारीत जावलीकरांच्या विलगीकरणाकरीता वापरात आणण्याकरीता . जावली तालुक्यांचे तहसिलदार शरद पाटील यांना मागणी करणारे पत्र देण्यात आले.
जावली तालुका कोरोनाचा हाॅटस्पाॅट बनत चालला आहे . याकरीता महसुल व आरोग्य विभाग जावली दक्ष असुन , याअगोदर विलगीकरणाकरीता छाबडा महाविद्यालय,’ कुडाळ व भंणग येथील मंगल कार्यालय महसुल विभागाकडुन तयार करण्यात आले आहेत . मात्र भविष्यात रुग्णाचा संख्यावाढ झाल्याने जागेची उपल्बधता कमी पडणार असल्याने पवार कुटुबीयाकडुन मेरुलिंग शिक्षण संस्थेची ५० हजार स्केअर फुटची इमारत भेटल्याने महसुल विभागाची जागेची अडचन कमी होण्यास मार्ग मिळाला आहे .जावली तालुक्यात कोरोना हाॅटस्पाॅट पार्श्वभुमीवर विलगीकरणाच्या जागेच प्रश्न पवार कुटुंबीयांनी दिलेल्या इमारतीमुळे मार्गी लागन्यास प्रयत्न होणार आहे .