Thursday, March 30, 2023

वाधवान ए तुने क्या किया !

- Advertisement -

महाबळेश्वर प्रतिनीधी । देशभर कोव्हीड १९ या संसर्गजन्य रोगाची महामारी सुरु असताना आणि देशात लाॅकडाऊन असताना लोणावळा ते पाचगणी असा प्रवास केल्याने चर्चेत आलेल्या वाधवान कुटुंबियांना आज सीबीआयने ताब्यात घेतले. त्यानिमित्ताने आपण या संपूर्ण घटनाक्रमावर पुन्हा एकदा प्रकाश टाकुयात. डीएचएफएल चे संचालक धीरज वाधवान व कपिल वाधवान या प्रख्यात मनिलाॅड्रींग प्रकरणात कोट्यावधी रुपायाचा घोटाळा केला असताना गृह विभागाचे विषेश सचिव अमिताभ गुप्ता याच्या मेहरनजर पत्रावर संचार बंदीला टांग लावुन लवाजम्यासह लोनावळा खंडाळ्याहुन महाबळेश्वरला स्वमालकीच्या “दिवाण ह्वीला “ या बंगल्यामध्ये एन्ट्री मारली. वाधवान बंधु विषेश गृहसचिवाच पत्र दाखवत सातारा जिल्ह्यांच्या संचार बंदीला टांग दाखवत महाबळेश्वरला दाखल झाल अन् महसुल प्रशासनासह गृह विभाग स्थानिक नगररपालीका प्रशासनाने “ वाधवान ए तुने क्या कीया “ असे म्हणत महसुल विभाग व स्थानिक नगरपालीका यांनी वाधवान कुटुंबीयानुढे चैाकशीचा ससेमीरा लावत वाधवान कुटुबांसह २३ जणांना पाचगणीच्या सेंट झवेयीर्स हायस्कुलच्या होस्टेल इमारती मध्ये संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्याचा महसुल प्रशासनाने निर्णय घेतला .

मात्र लाॅकडाऊन सुरु असताना जिल्हाबंदीला टांग लावुन महाबळेश्वरमध्ये दाखल झालेल्या वाधवान कुटुंबाला इतरानसारखाच कायदा हवा अशी जनभावना तयार झाली . महाविकास आघाडी सरकारला यांची उत्तरे देताना नाकीनऊ आले . संसर्गजन्य कायदा व आपात्कालीन परीस्थीत कायद्याअंतर्गत जिल्हाअधिकारी सातारा यांनी जिल्हाबंदी असताना महाबळेश्वर मध्ये प्रवेश केल्याबद्दल महसुल प्रशासनाकडून वाईच्या उपविभागीय अधिकारी चैागुले यांनी वाधवान कुटुंबासह २३ जणाविरोधात गुन्हा दाखल केला . अन् वाधवान कुटुबांसह २३ जणांना पाचगणी येथील सेट झवेयीर्स हायस्कुलच्या होस्टेलमध्ये संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले . चैाकात दिवसाच्या संय्थात्मक विलगीकरणात असतानाच सीबीआय कोर्टाने ५ मे पर्यंत सातारा जिल्हा न सोडण्याचे आदेश वाधवान कुटुबांला दिले .

- Advertisement -

महसुल प्रशासनाकडून पुन्हा पाचगणीच्या सेंट झवेयीर्स हायस्कुलमधुन वाधवान कुटुंबावा महाबळेश्वरच्या दिवान व्हीला या बंगल्यामध्ये होम क्वारटाईन केले . मात्र यादरम्यान मुबईच्या इडी कार्यालयाने वाधवान बंधुची चैाकशी करत लोनवळा ते महाबळेश्वर प्रवासादरम्यान वापरात आलेल्या महागड्या गाड्या मुबईच्या इडी कार्यालयाने पांजगणीत जप्त केल्या . वाधवान बंधुनवर कारवाईचा फास आवळण्याच्या सोपस्कार उपाय सुरु झाले होते . मात्र ५ मे पर्यंत वाधवान कुटुंबाला जिल्हा बंदीचे आदेश असल्याने वाधवान कुटुंबावर जुजबी कारवाई होवुन तो सहज सुटनार अशी परीस्थीत निर्माण झाली असताना सी बी आय ने अचानक सातारा पोलिसांना धीरज वाधवान व कपिल वाधवान यांना अटक करुन मुंबईला आणण्याचा आदेश दिल्याने पुन्हा एकदा कायदा हा सगळ्यांना सारखा आहे हे दाखवत “ वाधवान ए तुने क्या कीया “ अशी वेळ निश्चितच आली असल्याच बोलक चित्र बाधकाम बंधुच्या अटकेनतंर लपुन राहीले नाही हे मात्र निश्चित