हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांना पोटदुखीच्या त्रासामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यांना पित्ताशयाचा त्रास होत असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. सध्या पवार साहेबांची प्रकृती स्थिर असून ते त्यांचं रोजचं आवडतं काम कि न्युज पेपरच ते करत आहेत, अशी माहिती त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी ट्विटरद्वारे दिली आहे.
सुप्रभात, ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स,परिचारीका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार. ही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय @PawarSpeaks साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थात वर्तमानपत्रांचं वाचन, करीत आहेत. pic.twitter.com/ERf0Gl35Tp
— Supriya Sule (@supriya_sule) March 31, 2021
याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून म्हटलंय आहे की, प्रथम ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारीका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार. ही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय शरद पवार साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थात वर्तमानपत्रांचं वाचन करीत आहेत. शरद पवार यांच्या पित्त मालिकेतला खडा आज पहाटे बाजूला केला आहे. मात्र, पित्ताशयावर अजूनही सूज आहे. विविध तपासण्या चालू आहेत. पित्ताशयावरील सूज कमी झाल्यानंतरच त्यांचे ऑपरेशन होणार आहे अशी माहिती हॉस्पिटलकडून देण्यात आली आहे. शस्त्रक्रियेनंतर पवार साहेबांना दहा दिवस रुग्णालयातच ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे, अशी माहिती सुळे यांनी ट्विटरद्वारे दिली.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या सोमवारी पोटात दुखू लागल्यानं त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे निदान झाले होते. त्यामुळे पवार यांना ३१ मार्चला रुग्णालयात अॅडमिट होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मात्र, अचानक त्रास सुरू झाल्यानं शरद पवार मंगळवारीच रुग्णालयात दाखल झाले आहेत असं सांगत त्यांखासदार सुळे यांनी शरद पवारांचा रुग्णालयात पेपर वाचत असतानाचा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटच्याद्वारे अपलोड केला आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in