हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात Credit Card वापरणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यावर बँकाकडून अनेक ऑफर्सही दिल्या जात आहेत. तसेच ऑनलाईन कंपन्या देखील यावर जबरदस्त डिस्काउंट ऑफर देत आहेत. ज्यामुळे ग्राहकही दिलखुलासपणे खर्च करत आहेत. मात्र जर आपण क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले नाही तर बँक आपल्याकडून जास्त शुल्कही आकारु शकते. तसेच जर आपण वेळेवर पैसे भरत असाल तर यामुळे क्रेडिट कार्डची मर्यादाही वाढेल आणि क्रेडिट स्कोअरही चांगला राहण्यास मदत होईल.
मात्र त्याचप्रमाणे जर आपण सतत लेट पेमेंट करत असाल तर असे करणे टाळायला हवे. कारण लेट पेमेंटसाठी लेट पेमेंटचार्जही भरावा लागेल.
तसेच लेट पेमेंटचा आपल्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होऊन आपल्याला जास्त व्याज देखील द्यावे लागेल. तसेच सतत लेट पेमेंट केल्यास Credit Card जारी करणाऱ्या कंपनीकडून पैसे भरण्यासाठी दबाव आणण्यासाठी आपल्याला सारखा कॉल केला जाईल.
Credit Card च्या लेट पेमेंटसाठी आपली जमा केलेली रक्कम जास्त व्याज आणि शुल्क भरण्यासाठीच लागू शकते. तसेच, यामुळे क्रेडिट हिस्ट्री देखील खराब होईल, ज्यामुळे भविष्यात कोणतीही बँक आपल्याला कर्ज देण्यास टाळाटाळ करेल.
Credit Card चे बिल सतत उशिराने भरत राहिल्यास क्रेडिट कंपनीकडून पैसे वसूल करण्यासाठी कायदेशीर कारवाई देखील केली जाऊ शकते. यासोबतच Credit Card चे बिल वेळेवर भरले नाही तर आपली आर्थिक स्थितीही बिघडेल. ज्याचा परिणाम आपल्या गुंतवणूकीवरही होऊ शकेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.hdfcbank.com/personal/pay/cards/credit-cards
हे पण वाचा :
आता घरबसल्या Digital Gold वर मिळेल कर्ज, त्यासाठीचे व्याजदर पहा
खुशखबर !!! Ujjawla Yojana अंतर्गत LPG सिलेंडरवरील अनुदानाची मुदत एका वर्षासाठी वाढवली
Bank Holiday : एप्रिलमध्ये 15 दिवस बँका राहणार बंद, तपासा सुट्ट्यांची लिस्ट
Bike : दुचाकीचे सेल्फ स्टार्ट खराब झाले तर किक न मारताही कशी सुरू करावी ते जाणून घ्या
खुशखबर !!! आता Bank of Baroda च्या ग्राहकांना क्रेडिट कार्डद्वारे करता येणार UPI पेमेंट, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया