कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यात कोरोना काळात जे मोफत धान्य वाटप करण्यात आले, त्याचे अद्याप कमिशन मिळाले नाही. तेव्हा शासनाने ते कमिशन त्वरीत द्यावे अशी, मागणी सातारा जिल्हा अध्यक्ष अशोकराव पाटील यांनी केली आहे. कराड तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने आज एकदिवशीय लाक्षणिक उपोषण पुकारले आहे. त्यावेळी ते बोलत होते.
या उपोषणास बीड, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, पुणे, मिरज येथील संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच काॅंग्रेसच्या विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेटून पाठिंबा जाहीर केला. या उपोषणात 285 दुकानदारांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.
संघटनेच्या प्रमुखा मागण्या पुढीलप्रमाणे ः- 1)कोरोना कालावधीत संपुर्ण महाराष्ट्रातील रास्तभाव दुकानदारांनी मोफत धान्य वाटपाची व्यवस्था शासनाच्या नियमानुसार अखंड वाटप केले व करत आहेत. त्या वाटपाचे आज अखेर राहिलेले कमिशन त्वरीत मिळावेत.
2) ई-पॉस मशीनवर येणारे सर्व सरचे तांत्रिक प्रॉब्लेम त्वरीत दुरुस्त करून मिळावेत.
3)नवीन नियमानुसार ई-पॉस मशीनवर NFSA व PMGKAY या दोन योजनेचे दोन योजनेचे दोन वेळा अंगठा घ्यावा लागणार आहे. सध्याच्या नेटवर्कच्या प्रॉब्लेम मुळे दुकानदार व ग्राहक यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे व याकारणास्तव वाटपास वेळ लागत आहे. मागील प्रमाणे दोनही धान्याचे वाटप एकाच अंगठा मध्ये व्हावे.
4) सध्या शहर व शहरालगत धान्याची थेट वहातूक चालू आहे ते धान्य खराब येत आहे ते चांगल्या दर्जाचे मिळावे. मशीनवर माल वाटपासाठी 5 तारखेपर्यंत त्वरीत उपलब्ध करुन मिळावा.
5) ई-पॉझ मशीनवरती टुजी नेटवर्कचे सिमकार्ड असून ते 4 जी किंवा 5 जी सुविधेमध्ये उपलब्ध करुन मिळावे.
6) ज्या केशरी ए.पी.एल. कार्डधारकांना धान्य मिळत नाही. अशा कार्डधारकांना शासनाने धान्याचा पुरवठा करावा.
7) स्वतः धान्य दुकानदार विमा संरक्षण मिळावे.