Paytm IPO : कंपनी 8 ते 10 नोव्हेंबर दरम्यान 18,300 कोटींची सार्वजनिक ऑफर लॉन्च करणार ! अधिक तपशील तपासा

नवी दिल्ली । देशातील IPO मार्केट तेजीत आहे. एकामागून एक, अनेक कंपन्या त्यांचे इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच IPO आणत आहेत. त्याच वेळी, डिजिटल पेमेंट आणि फायनान्शिअल सर्व्हिस कंपनी पेटीएम (Paytm) भारतीय भांडवली बाजारातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO आणणार आहे आणि तो 8 ते 10 नोव्हेंबर दरम्यान लॉन्च केला जाऊ शकतो. सूत्रांनी मनीकंट्रोलला ही माहिती दिली आहे.

Paytm ची मूळ कंपनी One97 Communications ने त्याचा IPO आकार रु. 16,600 कोटींवरून रु. 18,300 कोटी केला आहे. एका सूत्राने सांगितले की, “रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स रजिस्ट्रार ऑफ कंपनीज (RoC) कडे दाखल करण्यात आले आहेत आणि ते 8 ते 10 नोव्हेंबर दरम्यान लॉन्च करण्याची योजना आहे. दुसर्‍या सूत्राने सांगितले की, 3 नोव्हेंबर रोजी अँकर प्लेसमेंट केले जाऊ शकते आणि Paytm च्या या मेगा ऑफरबद्दल गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

SEBI कडे दाखल केलेल्या DRHP नुसार, मॉर्गन स्टॅनले, गोल्डमन सॅक्स, एक्सिस कॅपिटल, ICICI सिक्युरिटीज, JP मॉर्गन, Citi आणि HDFC बँक IPO साठी गुंतवणूक बँकर म्हणून काम करत आहेत.

भारतीय इतिहासातील सर्वात मोठा IPO
Paytm चा IPO हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO असेल. याआधी हा विक्रम कोल इंडियाच्या नावावर होता. कोल इंडियाने एका दशकापूर्वी आपल्या IPO मधून सुमारे 15,000 कोटी रुपये उभे केले होते. विजय शेखर शर्मा यांनी 2000 मध्ये One97 लाँच केली. सुरुवातीला कंपनीने व्हॅल्यू-एडेड सर्विस प्रोव्हायडर म्हणून सुरुवात केली आणि नंतर ती ऑनलाइन मोबाइल पेमेंट फर्ममध्ये डेव्हलप झाली.