परीक्षा न देता PCMC मध्ये नोकरीची संधी; दर सोमवारी होणार मुलाखत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे येथे लवकरच (PCMC Recruitment 2023) काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून या भरतीच्या माध्यमांतून तज्ञ वैद्यकीय अधिकारी पदे भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे कोणतीही परीक्षा न देता केवळ मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हाला नोकरी मिळू शकते. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. दर सोमवारी या मुलाखती होणार आहेत.

संस्था – पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे

भरले जाणारे पद –

तज्ञ वैद्यकीय अधिकारी (Specialist Medical Officer)

पद संख्या – 73 पदे

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – दर सोमवारी

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान MBBS आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

Resume (PCMC Recruitment 2023)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दूसरा मजला, वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी – 18

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/marathi/