हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शिक्षक पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम) आणि सहाय्यक शिक्षक (उर्दू माध्यम) पदांच्या एकूण 209 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीमध्ये सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम) – 184 पदे आणि सहाय्यक शिक्षक (उर्दू माध्यम) – 25 पदे अशी एकूण 209 पदे भरली जाणार आहेत. पुण्यात तुम्हाला ही नोकरी करावी लागेल. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 1 जून 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम): B.Sc. B. Ed./ B. A. B. Ed./ B. P. Ed.
2. सहाय्यक शिक्षक (उर्दू माध्यम): B.Sc. B. Ed./ B. A. B. Ed
पगार किती? – 27,500/- रुपये प्रति महिना
अर्ज/ परीक्षा फी – नाही
Open/OBC/EWS: फि नाही.
अर्ज पाठवण्याचा पत्ता –
दिनदयाळ माध्यमिक विद्यालय, संत तुकाराम नगर, जुना मुंबई पुणे रस्ता, पिंपरी, पुणे-18.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in