हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Penny Stock : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला भरपूर नफा मिळावा अशी इच्छा असते. त्यासाठी ते सतत कमी वेळेत मोठा रिटर्न देणाऱ्या शेअर्सच्या शोधात असतात. त्यासाठी पेनी स्टॉक्स महत्वाचे ठरतात. अनेक गुंतवणूकदारही अशा पेनी स्टॉक्सवर लक्ष देऊन असतात. मात्र पेनी स्टॉक्सची किंमत कमी असली तरी त्यामध्ये जोखीम देखील खूप असते. आज आपण एका अशा शेअर्स बाबत जाणून घेणार आहोत, ज्याने गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न मिळवून दिला आहे.
आपण ज्या शेअर्स बाबत बोलत आहोत त्या कंपनीचे नाव दीपक नायट्रेट असे आहे. दीपक नायट्रेट अशी ही केमिकल कंपनी आहे. या कंपनीच्या शेअर्सचे मूल्य 17 रुपयांवरून 2,041 रुपये झाले आहे. ज्याने गेल्या काही वर्षांत जबरदस्त रिटर्न दिला आहे. Penny Stock
5 वर्षात दिला 900% पेक्षा जास्त रिटर्न
गेल्या पाच वर्षांत दीपक नायट्रेटच्या शेअर्सने आपल्या भागधारकांना 900 टक्क्यांहून जास्तीचा रिटर्न दिला आहे. गेल्या 5 वर्षांत हे शेअर्स 191 रुपयांवरून 2,041 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. या कालावधीत दीपक नायट्रेटच्या शेअर्सने सुमारे 968 टक्के रिटर्न मिळवून दिला आहे. Penny Stock
10 वर्षात 11,000% रिटर्न
दीर्घकाळासाठी गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना दीपक नायट्रेटच्या शेअर्सने मोठा नफा मिळवून दिला आहे. गेल्या दहा वर्षांत यामध्ये 11,000% पेक्षा जास्तीचे वाढ झाली आहे. या दरम्यान कंपनीचे 17.94 रुपयांवरून 2,041 रुपयांपर्यंत वाढले आहेत. जर एखाद्याने यामध्ये एक लाख रुपये गुंतवले असते तर त्याला सुमारे एक कोटी रुपये मिळाले असते. Penny Stock
तज्ञांचे मत जाणून घ्या
ब्रोकरेज आनंद राठीच्या अलीकडील रिपोर्ट्स नुसार, केमिकल कंपनीचे हे शेअर्स सध्या चांगल्या स्थितीत आहे. तसेच जागतिक कंपन्यांना प्राथमिक पुरवठादार म्हणून ही कंपनी एक विश्वासार्ह पर्याय म्हणून देखील उदयास येण्यास तयार आहे. मोतीलाल ओसवाल या ब्रोकरेज फर्मने या शेअर्ससाठी आपले ‘न्यूट्रल’ रेटिंग कायम ठेवले आहे. Penny Stock
हे लक्षात घ्या कि, सरकारी विमा कंपनी असलेल्या एलआयसीचा दीपक नायट्रेटमध्ये मोठा हिस्सा आहे. LIC कडे दीपक नायट्रेटचे 68 लाखांहून जास्त शेअर्स आहेत.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.godeepak.com/
हे पण वाचा :
ICICI Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याजदर तपासा
Kisan Vikas Patra च्या गुंतवणूकदारांना मिळणार दुप्पट फायदा !!!
Saving Account बंद करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ 5 गोष्टी, अन्यथा होऊ शकेल नुकसान
Multibagger Stocks : ‘या’ 3 केमिकल कंपन्यांच्या शेअर्सनी दिला 800% रिटर्न !!!
गेल्या 1 वर्षात ‘या’ Penny Stock ने गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!