हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Penny Stock : गेल्या काही वर्षांत भारतीय शेअर मार्केटमध्ये अनेक कंपन्यांचे शेअर्स मल्टीबॅगर म्हणून उदयास आले आहेत. ज्यामध्ये अनेक पेनी स्टॉक्सचा देखील समावेश आहे. या दरम्यान या शेअर्सने गुंतवणूकदारांना हजारो पट रिटर्न मिळवून दिला आहे. Rajnish Wellness चे शेअर्स देखील असेच आहेत. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत हा पेनी स्टॉक 55 पैशांवरून 19 रुपयांवर आला आहे. या कालावधीत या शेअर्सने गुंतवणूकदारांना 3,300 टक्के रिटर्न दिला आहे. या स्मॉलकॅप कंपनीची मार्केट कॅप 1,452 कोटी रुपये आहे.
हे लक्षात घ्या कि, 16 जानेवारीपर्यंत या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये (Penny Stock) सलग 6 सत्र अप्पर सर्किट दिसून आले. मात्र त्यानंतर 17, 18 आणि 19 फेब्रुवारी अशा सलग तीन सत्रांमध्ये यामध्ये लोअर सर्किट लागले. त्याच प्रमाणे 20 जानेवारी आणि आज 23 जानेवारी रोजी कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर आले आहेत.
गेल्या दोन वर्षांत दिला 3,300 टक्के रिटर्न
गेल्या एका महिन्यात या शेअर्सची किंमत प्रति शेअर ₹13.58 वरून ₹19 पर्यंत वाढली आहे. या कालावधीत यामध्ये जवळपास 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच गेल्या सहा महिन्यांत हे शेअर्स 9.60 रुपयांवरून 19 रुपयांपर्यंत वाढले आहेत. या काळात गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास दुप्पट झाले आहेत. 2023 मध्ये हे शेअर्स 22 टक्क्यांनी वाढले आहेत.
गेल्या एका वर्षात, या शेअर्सने गुंतवणूकदारांना 450 टक्क्यांहून जास्तीचा रिटर्न दिला आहे. जानेवारी 2021 मध्ये 0.55 पैसे किंमत असलेले हे शेअर्स आज 19 रुपये प्रति शेअर्सच्या पातळीवर आहेत. गेल्या दोन वर्षांत या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 3300% पेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. Penny Stock
गुंतवणूकदार झाले मालामाल
जर एखाद्याने या पेनी स्टॉकमध्ये सहा महिन्यांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याची किंमत सुमारे 2 लाख रुपये झाली असती. तसेच जर एखाद्याने यामध्ये वर्षभरापूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याची किंमत 5.50 लाख रुपये झाली असती. त्याचप्रमाणे जर एखाद्याने दोन वर्षांपूर्वी यामध्ये गुंतवणूक केली असती तर त्याचे मूल्य 34 लाख रुपये झाले असते. Penny Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/rajnish-wellness-limited/rajnish/541601
हे पण वाचा :
Bajaj Finance कडून FD वर मिळत आहे जबरदस्त व्याज, पहा नवीन व्याजदर
Layoffs : कोरोनानंतर आता मंदीची भीती… आयटी सेक्टरमध्ये कपातीची वेळ का आली ???
Post Office च्या ‘या’ योजनेमध्ये पैसे गुंतवून मिळवा दुप्पट नफा !!!
PPF मधील गुंतवणूकीबाबत आले मोठे अपडेट, हे जाणून घेतल्याशिवाय गुंतवू नका पैसे
Budget 2023 : अर्थसंकल्प छापणाऱ्यांना हॉस्पिटलमध्येही जाण्यास असते मनाई, डॉक्टरांची टीमही असते मंत्रालयात कैद!