Friday, March 24, 2023

PPF मधील गुंतवणूकीबाबत आले मोठे अपडेट, हे जाणून घेतल्याशिवाय गुंतवू नका पैसे

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारत सरकारने सुरू केलेली सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ही दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. यावर चांगला व्याजदर देखील मिळतो. याबरोबरच यामध्ये पॉलिसीधारकाला 500 रुपयांद्वारे पीपीएफ खाते सुरू करता येते. तसेच यामध्ये एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवता येतात. इतकंच नाही तर या योजनेमध्ये खातेदाराला कर्ज आणि ठराविक कालावधीनंतर आंशिक पैसे काढण्याची सुविधा देखील मिळते.

PPF Account Holders: 5 Rules to Know Before Withdrawing PPF Contributions  Prematurely

- Advertisement -

PPF योजनेच्या फायद्यांविषयी जाणून घ्या

पीपीएफ मध्ये कोणत्याही व्यक्तीला स्वत:च्या नावाने SBI PPF खाते उघडता येते. तसेच अल्पवयीन मुलाच्या बाबतीत ते पालकांच्या वतीने उघडले जाऊ शकते. या योजनेंतर्गत कमीत कमी 500 रुपये तर जास्तीत जास्त ₹ 1.5 लाख रुपये वार्षिक गुंतवणूक करता येते. तसेच यामध्ये पॉलिसीधारकाला एकरकमी किंवा एका वर्षात 12 सुलभ हप्त्यांमध्ये पैसे भरता येतील.

12 Must Know Things About Public Provident Fund (PPF)

SBI PPF खात्याची मुदत 15 वर्षे आहे. मात्र, मॅच्युरिटीनंतर, पॉलिसीधारकाला याची मुदत आणखी 5 वर्षांनी वाढवता येते. यावरील व्याज दर हे केंद्र सरकारकडून तिमाही आधारावर ठरवले जातात. सध्या, यावर 8% वार्षिक दराने व्याज दर दिले जात आहे. ते दरवर्षी 31 मार्च रोजी दिले जाते.

PPF Interest Rate Was Cut Then Restored! What FM Nirmala Sitharaman's Tweet  Means For Public Provident Fund Account Holders

SBI PPF खात्यांवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीची परवानगी मिळते. या योजनेंतर्गत मिळणारे रिटर्न देखील टॅक्स फ्री आहेत. या खात्यांमध्ये नॉमिनेशनची सुविधा देखील उपलब्ध आहे. यामध्ये पॉलिसीधारकाला एक किंवा जास्त व्यक्तींना नॉमिनी म्हणून नॉमिनेशन करता येते. SBI PPF योजना खात्याचे वय तसेच पीपीएफ खात्यात उपलब्ध शिल्लक यावर आधारित कर्ज आणि पैसे काढण्याची सहज उपलब्धता देते.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : http://www.nsiindia.gov.in/InternalPage.aspx?Id_Pk=55

हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता