हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Penny Stock : भारतीय शेअर बाजारात गेल्या वर्षभरात बरेच चढउतार झाल्याचे पहायला मिळाले आहे. शेअर बाजारात असेही अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. यामध्ये काही पेनी स्टॉक्सचा समावेश आहे. Hemang Resources कंपनीचे शेअर्स देखील 2022 मधील असाच एक मल्टीबॅगर स्टॉक आहे. या शेअर्सने बेंचमार्क निर्देशांकापेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. मात्र, पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे जोखमीचे देखील असते कारण ते एकाच ट्रिगरवर दोन्ही मार्गांनी जाते.
शेअर्समध्ये झाली जोरदार वाढ
Hemang Resources कंपनी BSE वर लिस्टेड आहे. इथे हे लक्षात घ्या कि, गेल्या एका वर्षाच्या कालावधीत या शेअर्सची किंमत 3.25 रुपयांवरून सुमारे 66 रुपये प्रति शेअरपर्यंत वाढली आहे. या एका वर्षाच्या कालावधीमध्ये या शेअर्सने सुमारे 1900 टक्के रिटर्न दिला आहे. तसेच गेल्या एका आठवड्यात, या स्मॉल-कॅप स्टॉकमध्ये दोन वेळा अप्पर सर्किट दिसून आले. या दरम्यान शेअरधारकांना 5.50 टक्क्यांहून जास्त रिटर्न मिळाला आहे. Penny Stock
हेमांग रिसोर्सेसच्या शेअर्स बाबत जाणून घ्या
गेल्या एका महिन्यात हे शेअर्स ₹56.50 वरून ₹66 प्रति शेअर पातळीपर्यंत वाढला आहे. म्हणजेच गेल्या एका महिन्यात यामध्ये सुमारे 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच गेल्या सहा महिन्यांत हे शेअर्स ₹45.20 वरून ₹66 प्रति शेअर पातळीपर्यंत वाढला आहे. ज्यामुळे भागधारकांना 45 टक्के रिटर्न मिळाला आहे. त्याचप्रमाणे, गेल्या एका वर्षात हे शेअर्स सुमारे ₹3.25 च्या पातळीवरून ₹66 प्रति शेअरच्या पातळीवर वाढला आहे, ज्यामुळे भागधारकांना 1900 टक्के रिटर्न मिळाला आहे. Penny Stock
गुंतवणूकदार झाले मालामाल
जर एखाद्याने आठवड्यापूर्वी यामध्ये ₹1 लाख गुंतवले असते, तर त्याचे आज ₹1.05 लाख झाले असते. तसेच जर एखाद्याने एका महिन्यापूर्वी यामध्ये ₹1 लाख गुंतवले असते, तर आज त्याचे ₹1.15 लाख झाले असते. त्याचप्रमाणे जर एखाद्याने सहा महिन्यांपूर्वी यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे आज 1.45 लाख रुपये झाले असते. मात्र, एखाद्याने वर्षभरापूर्वी यामध्ये ₹1 लाख गुंतवले असते, तर आज ₹20 झाले असते. Penny Stock
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/hemang-resources-ltd/hemang/531178/
हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Gold Price Today : दिवाळीनंतरही सोन्या-चांदीच्या दरातील घसरण सुरूच, नवीन दर पहा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा