हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Penny Stock : गेल्या काही वर्षांत शेअर बाजारातील अनेक छोट्या कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना मोठा रिटर्न मिळवून दिला आहे. एनबीएफसी क्षेत्रातील Elcid Investment देखील याच श्रेणीत येतात. गेल्या 5 वर्षांत या कंपनीने शेअर्सच्या किंमतीच्या तुलनेत गुंतवणूकदारांना मोठा डिव्हीडंड देऊन खूश केले आहे. 2 रुपये किंमत असलेल्या या शेअर्सने अलीकडेच 15 रुपयांचा डिव्हीडंड जाहीर केला आहे. याची खास गोष्ट म्हणजे या कंपनीकडून गुंतवणूकदारांना सलग 5 वर्षे डिव्हीडंड दिला जात आहे. Penny Stock
सध्या Elcid Investment च्या शेअर्सची किंमत 2.31 रुपये आहे. त्याच वेळी, त्याचा लाइफ टाइम हाय 17 रुपये आहे. मात्र, या शेअर्समध्ये क्वचितच ट्रेडिंग होताना दिसत आहेत. 1981 मध्ये स्थापना झालेल्या या कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्नबद्दल बोलायचे झाले तर याचे एकूण 2 लाख शेअर्सपैकी 1.5 लाख शेअर्स प्रमोटर्सकडे आहेत. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरील माहिती नुसार, Elcid Investment कंपनीकडून शेअर्स आणि म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक केली जाते. कंपनीच्या मुराहर इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग कंपनी लिमिटेड या दोन उपकंपन्या देखील आहेत. Penny Stock
या कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीचा गेल्या 5 वर्षांचा कल बघितला तर याच्या डिव्हीडंडची किंमत त्याच्या एक्स-डेट किंमतीपेक्षा खूप जास्त आहे. आज हे शेअर्स 2.31 रुपयांवर उघडले आहेत. दुसरीकडे, सोमवारी शेअर्स 2.20 वर बंद झाला. आज या शेअर्सचे प्रमाण 1 कोटी 70 लाखांच्या जवळपास आहे. हे लक्षात घ्या कि, गेल्या काही वर्षांत NBFC क्षेत्रातील कंपन्यांनी गुंतवणूकदारांना प्रचंड पैसा मिळवून दिलेला आहे. यामध्ये बजाज फायनान्स, मुथूट फायनान्स, श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स सारख्या अनेक कंपन्यांचा समावेश आहे. Penny Stock
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : http://elcidinvestments.com/
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत झाले बदल, आजचे नवीन भाव तपासा
Jio च्या ‘या’ रिचार्जद्वारे अनलिमिटेड कॉलिंगसोबत मिळवा 336 दिवसांच्या व्हॅलिडिटी
PPF मध्ये जमा केलेले पैसे काढण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
आता अशा प्रकारे WhatsApp वर पाठवलेले मेसेजही Edit करता येणार !!!
SBI च्या ‘या’ FD वर जास्त व्याज मिळविण्याची संधी, त्याविषयी जाणून घ्या