हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । penny stocks : पैसे कमावण्याची ईच्छा प्रत्येकालाच असते. त्यासाठी अनेक ठिकाणी गुतंवणूक केली जाते. शेअर मार्केट हे देखील गुंतवणुकीचे एक चांगले माध्यम आहे. यामध्ये योग्य माहिती घेऊन गुंतवणूक केल्यास आपल्याला भरपूर नफा मिळतो. ज्या लोकांकडे भांडवलाची कमतरता असते त्यांच्यासाठी पेनी स्टॉक फायदेशीर ठरतात. कारण यामध्ये कमी पैशांमध्ये शेअर्स खरेदी करता येते. मात्र पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे अत्यंत जोखमीचे मानले जाते. यामागील कारण असे कि, पेनी स्टॉक खूप झपाट्याने खाली येतात.
अनेक वेळा असे पहायला मिळाले आहे की, कमी कालावधीतच penny stocks जवळपास 90 टक्क्यांपर्यंत घसरले. मात्र असे प्रत्येक स्टॉकच्या बाबतीत घडेलच असे नाही. आताही असे अनेक पेनी स्टॉक आहेत जे आपल्या गुंतवणूकदारांना भरपूर नफा मिळवून देत आहेत. चला तर मग आज आपण अशा पेनी स्टॉक्सबद्दल माहिती घेउयात ज्यांनी अवघ्या एका वर्षातच जवळपास 6,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न दिला आहे.
Equippp Social
Equippp Social Agri कमोडिटीचे ट्रेडिंग, प्रोडक्शन आणि प्रोसेसिंग करते. मागील वर्षी म्हणजेच मे 2021 मध्ये या शेअर्सची किंमत 5 रुपये होती. मात्र गेल्या चार महिन्यांत या शेअर्सची किंमत 185 रुपये झाली. मात्र, काही काळानंतर हे शेअर्स 100 रुपयांपर्यंत खाली आले. तसेच मागील एका वर्षाकडे बघितल्यास या शेअर्स मध्ये तब्ब्ल 2800 टक्क्यांची वाढ झाली आहे. penny stocks
Crescenda Solutions
हा देखील एक असा penny stocks आहे ज्याची किंमत एक वर्षापूर्वी एक रुपयापेक्षा कमी होती. जून 2021 मध्ये या शेअर्सची किंमत 60 पैसे प्रति शेअर इतकी होती. मात्र गेल्या एका वर्षातच या शेअर्सने 5,400 टक्क्यांची मोठी झेप घेतली आहे. या कंपनीची मार्केटकॅप जवळपास 34 अब्ज रुपये इतकी आहे. Crescenda ही Solutions IT, Digital Media आणि IT बेस्ड सर्व्हिस देते. मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्पेसमध्ये आपले स्थान आणखी बळकट करण्यासाठी कंपनीने नुकतेच ल्युसिडा टेक्नॉलॉजीज, बंगळुरू मधील 100% हिस्सा विकत घेतला आहे
Raj Rayon Industries
एका मीडिया रिपोर्ट्सनुसार एका वर्षांपूर्वी या शेअर्सची किंमत पन्नास पैशांपेक्षा कमी होती. मात्र वर्षभरातच तो 15 रुपयांवर पोहोचला. अशा प्रकारे, या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना एका वर्षातच 6,165% चा मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. मागील सात तिमाहीत कंपनीला तोटा सहन करावा लागला होता. मात्र या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात मोठी वाढ झाली आहे.
Penny Stocks अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.5paisa.com/share-market-today/penny-stocks
हे पण वाचा :
Bank FD : ‘या’ सरकारी बँकेने वाढवले आपल्या FD चे व्याजदर !!!
Fixed deposits : आता ‘या’ स्मॉल फायनान्स बँकेनेही FD वरील व्याजदरात केली वाढ !!!
Upcoming cars : इलेक्ट्रिक आणि SUV सहित जूनमध्ये लॉन्च होणार ‘या’ 4 सर्वोत्कृष्ट कार !!!
EPFO : कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी !!! आता व्याजाचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार