हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Atal Pension Yojana : म्हातारपणी पेन्शनमुळे एक प्रकारचा आधार मिळतो. त्यामुळेच अनेक लोकं रिटायरमेंटनंतरही खात्रीशीर पेन्शन मिळवण्यासाठी धडपड करत असतात. यासाठी केंद्र सरकारच्या अटल पेन्शन योजनेचा फायदा घेता येऊ शकेल. याद्वारे आपल्याला दरमहा थोडी थोडी रक्कम जमा करून रिटायरमेंटसाठी मोठा पेन्शन फंड तयार करता येईल. हे लक्षात घ्या कि, 18-40 वर्षांपर्यंतच्या कोणत्याही व्यक्तींना यामध्ये गुंतवणूक करता येते.
Atal Pension Yojana मध्ये किमान 20 वर्षे पैसे जमा करावे लागतील. तसेच यासाठीच मासिक हप्ता हा आपल्या वयावर अवलंबून असेल. ही योजना अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली. असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी केंद्र सरकारकडून ही योजना सुरु करण्यात आली होती. चला तर मग या योजनेबाबत सविस्तरपणे माहिती जाणून घेउयात…
किती पेन्शन मिळेल ???
या पेन्शनसाठी सरकारकडून 1,000, 2000, 3000, 4,000 आणि 5,000 रुपये प्रति महिना असे 5 स्लॅब निर्धारित करण्यात आले आहेत. आपल्याला हव्या असलेल्या या पेन्शन स्लॅबनुसार गुंतवणूक करावी लागेल. याच्या मुदतपूर्तीनंतर किती पेन्शन मिळेल हे गुंतवणुकीची रक्कम आणि वयाद्वारे ठरवले जाईल. जर आपल्याला 5,000 रुपयांची पेन्शन हवी असेल तर वयाच्या 18 व्या वर्षापासून दरमहा 210 रुपये जमा करावे लागतील. जर वयाच्या 25 व्या वर्षी गुंतवणूक सुरू करून 5,000 रुपये पेन्शन हवी असेल तर दरमहा 376 रुपये जमा करावे लागतील. त्याचबरोबर यासाठी 30 वर्षांच्या ठेवीदारांना 577 रुपये, 35 वर्षांच्या ठेवीदारांना 902 रुपये आणि 39 वर्षांच्या ठेवीदारांना 1318 रुपये जमा करावे लागतील.
नियमात झाला बदल
हे लक्षात घ्या कि, इन्कम टॅक्स भरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला 1 ऑक्टोबर 2022 नंतर Atal Pension Yojana मध्ये सहभागी होता येणार नाही. 10 ऑगस्ट रोजी यासंदर्भात एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तसेच 1 ऑक्टोबर रोजी किंवा त्यानंतर, या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या आयकरदात्याचे खाते बंद केले जाईल आणि खात्यात जमा केलेले पेन्शनचे पैसे त्यांना परत केले जातील.
किती लोकं सामील झाले ???
हे लक्षात घ्या कि, आतापर्यंत 4 कोटी लोकं Atal Pension Yojana मध्ये सामील झाले आहेत. 2015-16 साली केंद्र सरकारकडून ही योजना सुरू करण्यात आली होती. ही योजना विशेषत: अशा लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे ज्यांना इतर कोणत्याही सरकारी पेन्शनचा लाभ मिळू शकणार नाही. अवघ्या 6 वर्षात 4 कोटी लोकांपर्यंत ही योजना पोहोचली आहे. एकट्या गेल्या आर्थिक वर्षात 99 लाख लोकं या योजनेशी जोडले गेले आहेत. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीनुसार, आर्थिक वर्ष 2022 च्या अखेरीस जवळपास 4.01 कोटी लोकांनी या योजनेमध्ये गुंतवणूक केली. यापैकी 44 टक्के महिला तर 45 टक्के ग्राहक 18-25 वयोगटातील होते.
UPI द्वारे देखील पेमेंट करता येईल
आता Atal Pension Yojana च्या खातेदारांना UPI द्वारे देखील पेमेंट करता येईल. यापूर्वी हे डिपॉझिट्स फक्त IMPS/NEFT/RTGS द्वारे करता येत होते. या नवीन पेमेंट सर्व्हिसमुळे, खातेधारकांना पेमेंट करण्यात आणखी सुविधा मिळतील. कारण UPI द्वारे कधीही पेमेंट करता येऊ शकेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.npscra.nsdl.co.in/scheme-details.php
हे पण वाचा :
Bank FD : आता ‘या’ 2 बँकांनी आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात केली वाढ, नवे दर पहा
ई-तिकीटिंग सिस्टीम आणखी वेगवान करण्यासाठी Railway कडून सल्लागार कंपनीची नियुक्ती !!!
Railway कडून आज 142 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे लिस्ट पहा
Aadhar Card द्वारे सरकार देणार 5 लाखांपर्यंतचे कर्ज !!! मेसेज मागील सत्य जाणून घ्या