हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । EPFO ने पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. आता पेन्शनधारक त्यांचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट दाखल करण्यासाठी फेस रिकॉग्निशन फॅसिलिटीची मदत घेऊ शकतात. याचा सर्वात मोठा फायदा त्या पेन्शनधारकांना होईल ज्यांच्या बोटांचे ठसे आणि बुबुळांचे ठसे बायोमेट्रिक्स जुळवणे अवघड जाते.
हे लक्षात घ्या कि, पेन्शन मिळविण्यासाठी पेन्शनधारकांना दरवर्षी लाईफ सर्टिफिकेट दाखल करावे लागते. हातुम्ही जिवंत असल्याचा पुरावा असतो. आता हे दाखल करणे आधीपेक्षा जास्त सोयीस्कर असेल.
केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी पेन्शनधारकांसाठी फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञान सुरू केले. याशिवाय कामगार मंत्र्यांनी पेन्शन आणि कर्मचाऱ्यांच्याडिपॉझिट्सशी संबंधित इन्शुरन्स प्लॅन्ससाठी कॅल्क्युलेटरही लॉन्च केले. या कॅल्क्युलेटरद्वारे, पेन्शनधारक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पेन्शनव्यतिरिक्त देठ बेनेफिट्सचे कॅल्क्युलेशन ऑनलाइन करता येईल.
यासोबतच कामगार मंत्र्यांनी EPFO चे प्रशिक्षण धोरणही जारी केले. EPFO चे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सक्षम, उत्तरदायी आणि भविष्यासाठी सज्ज बनवणे हा त्यामागील उद्देश आहे. या अंतर्गत 14,000 कर्मचार्यांना वार्षिक 8 दिवसांचे प्रशिक्षण दिले जाईल. त्याचे एकूण बजट हे वेतन बजेटच्या 3% असेल. यासह, कामगार मंत्र्यांनी EPFO ला कार्यक्षम आणि उत्तरदायी बनवण्याच्या उद्देशाने कायदेशीर फ्रेमवर्क डॉक्युमेंट्स देखील जारी केले जेणेकरुन खटले आणि त्याचा निपटारा वेळेत सुनिश्चित करता येईल.
PF फंडावरील व्याजात वाढ होण्याची अपेक्षा करणाऱ्या लोकांना EPFO कडून धक्का मिळाला आहे. वास्तविक, पेन्शन संस्थेने इक्विटीमधील गुंतवणुकीची मर्यादा 15 टक्क्यांवरून 20 टक्के करण्याचा प्रस्ताव मागे घेतला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजमध्ये ते विचारार्थ ठेवण्यात आले नाही. EPFO चे ट्रस्टी हरभजन सिंग यांनी सांगितले की,”कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी याला विरोध केला होता, त्यानंतर या प्रस्तावावर विचार करण्यात आला नाही.” मात्र शेअर बाजाराची सध्याची स्थिती पाहता या प्रस्तावावर प्रतिनिधींना सविस्तर चर्चा हवी असल्याचे ते म्हणाले.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.epfindia.gov.in/
हे पण वाचा :
Bank of Baroda कडून पेमेंट्सशी संबंधित नवीन नियम आजपासून लागू !!!
Hyundai Palisade 2022 : ह्युंदाईची ‘ही’ 7 सीटर SUV लवकरच बाजारात; पहा फीचर्स आणि किंमत
ITR भरण्यासाठी PAN-Aadhaar Link असणे का महत्वाचे आहे ???
Gold Price Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण !!! नवीन दर पहा
iQOO 9T : लवकरच लॉन्च होणार iQOO चा दमदार मोबाइल; पहा किंमत आणि फीचर्स