सातारा | साताऱ्यात एक मजेदार किसा घडला आहे. बुरखा घालून प्रियसीला भेटायला आलेल्या प्रियकराला मुलं चोरणारा व्यक्ती समजून लोकांनी बेदम मारहाण केली आहे. साताऱ्यातील करंजे येथील तामजाईनगरमध्ये एक व्यक्ती बुरखा घालून आला होता. तो शाळेचे नाव विचारात होता. यावेळी तेथील एका दुकानदाराला संशय आल्याने त्याने त्याला पकडले. यावेळी बुरख्यात स्त्री नसून पुरुष असल्याचे लक्षात येताच, हा मुले पळवायला आला की काय, अशा संशय आल्याने त्या युवकाला बेदम मारहाण करण्यात आली.
त्यानंतर संबधित युवकाला शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच तो प्रेयसीला भेटायला आल्याचे कबूल केले. प्रेयसी आणि तिचा हा प्रियकर दोघेही विवाहित आहे. पण प्रियसीला वेश बदलून येणे या प्रियकराला चांगलेच महागात पडले. लोकांनी चोप तर दिलाच त्याच बरोबर पोलिसांनी ओळख लपवणे, हा गुन्हा दाखल केला आहे.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/2951865208449421
विवाहित प्रियसीला भेटण्यासाठी आलेल्या विवाहित प्रियकराला चांगलाच प्रसाद मिळाला. लोकांनी गर्दी करून चांगलाच चापटला. अखेर पोलिसांनी त्यांची सुटका केली, पण आता त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहेच. परंतु त्याबरोबर खरी ओळखही समोर आली आहे. त्यामुळे चांगलाच बुरखा फाटला असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.