उद्धव ठाकरे बोगस माणूस, शिवसेना रसातळाला जाणार; राणेंचा प्रहार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राणे कुटुंबीय यांच्यातील वाद काही महाराष्ट्राला नवा नाही. त्यातच आता शिवसेनेच्या सध्याच्या परिस्थितीवरून निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे बोगस माणूस आहे. शिवसेना आता रसातळाला जाणार अशा शब्दात त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना निलेश राणे म्हणाले, उद्धव ठाकरेंची सेना ही रसातळाला जाणार आहे. त्यांना आता कोणीही वाचवू शकणार नाही. त्यांचे भविष्य ठरलं आहे. ते उद्ध्वस्त होणार, आज बाळासाहेबांचा पक्ष १५ आमदारांचा पक्ष करण्याचे काम जर कोणी केले असेल तर ते उद्धव ठाकरे यांनी केले आहे. जे शिल्लक १५ आमदार आहेत ते पण राहतील का नाही याची शंका आहे.

उद्धव ठाकरे बोगस माणूस आहे, त्यांच्याकडे कोणताही मास्टर प्लॅन नाही. आता जे आमदार राहिले आहेत तेच कसे वाचवायचे यासाठी उद्धव ठाकरे धडपड करतात अशी टीका निलेश राणेंनी केली. दरम्यान, निलेश राणेंच्या या टीकेला शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर येते हे पाहावं लागेल. भविष्यात राणे- ठाकरे वाद आणखी विकोपाला जाण्याची शक्यता आहे.