घाटीतील कर्मचाऱ्यांची नियमित कोरोना चाचणी करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद । वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी बुधवारी व्हिडीओ काॅन्फरन्सद्वारे घाटी रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेतला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची नियमितपणे कोरोना चाचणी करण्यात यावी, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी. यासह कोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी सूचना अमित देशमुख यांनी केली. घाटीत प्रत्येक गंभीर कोरोना रुग्णाला बेड मिळेल, या दृष्टीने प्रयत्नशील राहण्याचीही सुचनाही देशमुख यांनी केली.

घाटीत बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी भेट घेऊन, कोरोना रुग्णांसाठी वाढीव सुविधांच्या कामकाजाचा आढावा घेतला. वाॅर्ड क्रमांक-४ येथील कामकाजाची त्यांनी पाहणी केली. यावेळी प्रभारी अधिष्ठाता डाॅ. वर्षा रोटे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डाॅ. विकास राठोड यांची उपस्थिती होती.

एक हजारापर्यंत वाढणार ऑक्सिजन खाटा

घाटी रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनच्या खाटा एक हजारापर्यंत वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याबरोबर आयसीयू खाटा, व्हेंटिलेटरसह आवश्यक सुविधा वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी २२ कोटींचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात आला आहे, अशी माहिती घाटी प्रशासनातर्फे देण्यात आली.

Leave a Comment