मोमबत्ता तलावात नाैका विहाराला जिल्हाधिका-यांकडून परवानगी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | मराठवाड्यातील पहिला नाैकाविहार प्रकल्प दाैलताबादच्या कुशीत असलेल्या मोमबत्ता तलावात नाैकाविहाराला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी परवानगी दिली आहे. याशिवाय दोन कोटींचा निधीही जिल्हा परिषदेला दिला आहे.

जिल्हा नियोजन समितीकडे जिल्हा परिषद प्रशासनाने सातत्याने पाठपुरावा केल्याने, तीन वर्षांपूर्वी सव्वाकोटींचा निधी दिला होता. त्यातून ६२ लाख खर्च करून बोटींगतळ, खिडकीघर, कॅन्टीन, वाहनतळ, स्वच्छतागृह, पर्यटकांसाठी सुविधांची कामे बांधकाम विभागाने केली होती.हा निधी वेळेत खर्च न झाल्याने परत गेला.

जिल्हा परिषदेने या प्रकल्पासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांच्या कार्यकाळातही पाठपुरावा सुरू ठेवला. आता पुन्हा या प्रकल्पाला दोन कोटींचा निधी देवू केला आहे. त्यामुळे यावर्षी तरी औरंगाबादकरांचे नाैकाविहार करण्याचे स्वप्न पुर्ण होईल अशी अपेक्षा बांधकाम विभागाने व्यक्त केली आहे. जिल्हा परिषदेने या वर्षी झकास पठाराकडेही लक्ष केंद्रित केले असून, त्यासाठी ५१ लाखांच्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. त्यातून जैव वैविध्यतेचे संवर्धन, ग्रामीण भागात पर्यटनातून रोजगार संधी उपलब्ध करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Grou

Leave a Comment