Personal Finance : आता खिसा होणार रिकामा, जूनमध्ये केले जाणार ‘हे’ 5 आर्थिक बदल !!!

Personal Finance
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Personal Finance : येत्या महिन्यात म्हणजेच जूनमध्ये काही आर्थिक बदल देखील होणार आहेत. हे असे 5 मोठे बदल असणार आहेत, ज्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर होईल. चला तर मग त्याविषयी सविस्तरपणे जाणून घेउयात…

मोटर इन्शुरन्स प्रीमियम

आता आपला मोटार इन्शुरन्सचा हप्ता देखील महागणार आहे. रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नुकतेच याबाबतची एक अधिसूचना जारी केली आहे . याध्ये सांगितले गेले कि, 1000 सीसी इंजिन क्षमतेच्या कारसाठीचा इन्शुरन्स प्रीमियम आता 2,094 रुपये असेल, जो कोविड-19 महामारीपूर्वी 2,072 रुपये होता. याशिवाय 1,000 सीसी ते 1500 सीसी इंजिन असलेल्या कारसाठीचा इन्शुरन्स प्रीमियम 3221 रुपयांवरून 3416 रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. Personal Finance

गोल्ड हॉलमार्किंगचा दुसरा टप्पा

1 जूनपासून गोल्ड हॉलमार्किंगचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. यावेळी 32 नवीन जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग सेंटर्स उघडण्यात येणार आहेत. याआधी 256 जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग सेंटर्स होते. आता एकूण 288 जिल्ह्यांमध्ये केवळ 20 ते 24 कॅरेटचे हॉलमार्किंग केलेले सोनेच विकले जाईल.

Gold Hallmark Identification Wizard

SBI होम लोन

जर आपण SBI कडून होम लोन घेतले असेल तर 1 जूनपासून तुमच्या खिशावर जास्त व्याजदराचा भार पडणार आहे. त्याच वेळी, जर तुम्ही बँकेकडून नवीन कर्ज घेणार असाल तर त्यासाठीचे व्याजदर देखील बदलले आहेत. SBI ने एक्सटर्नल बेंचमार्क लोन रेटमध्ये 40 बेस पॉइंट्स किंवा 0.40 टक्क्यांनी वाढ केली आहे. आता तो 7.05 टक्के झाला आहे. Personal Finance

SBI home loan, SBI home loan portfolio, SBI home loan business, SBI home loan interest rate | Business News – India TV

एक्सिस बँक बचत खाते

1 जूनपासून एक्सिस बँक बचत खात्यांच्या सर्व्हिस चार्जमध्ये वाढ करणार आहे. यामध्ये बचत खाती मेंटेन करण्यासाठी आकारले जाणारे सर्व्हिस चार्ज देखील समाविष्ट आहे. यासोबतच अतिरिक्त चेकबुकसाठी देखील चार्ज आकारण्यात येणार आहे.

Axis Bank Set To Buy Citigroup's India Retail Banking Business | Mint

आधार एनेबल्ड पेमेंट फी

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टम (AEPS) वर ट्रान्सझॅक्शन चार्ज आकारण्याचा निर्णय घेतला आहे. 15 जूनपासून हा नवीन नियम लागू होणार आहेत. हाअतिरिक्त चार्ज एका विशिष्ट व्यवहार मर्यादेनंतर आकारला जाईल. हे लक्षात घ्या कि, AEPS द्वारे, ग्राहकांना मिनी स्टेटमेंट, डिपॉझिट, पैसे काढणे आणि बॅलन्स इंव्कायरी सारख्या सुविधा मिळतात. Personal Finance

हे पण वाचा :

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात वाढ, आजचे नवीन भाव तपासा

Tax Saving :’या’ योजनांमध्ये गुंतवणूक करून मजबूत रिटर्नसह मिळवा टॅक्स सूट !!!

SIP मध्ये अशा प्रकारे गुंतवणूक करून मिळवा कोट्यवधी रुपये !!!

Beer Made From Urine : ‘या’ देशात चक्क युरीनपासून बनवली जाते बिअर !!! तुम्ही ते पिण्याचे धाडस कराल का???

Online Shopping वेबसाइट्सवरील fake reviews ना आळा घालण्यासाठी सरकारने उचलले ‘हे’ पाऊल